आज दिवसभरात: पुण्यात पावसाची बॅटिंग ते ट्रम्प कुटुंबीयांचं सेलिब्रेशन; महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 8 January 2021

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा

1. Farmer Protest: सुप्रीम कोर्टात जाणार नाही म्हणत शेतकऱ्यांचा 'जिंकू किंवा मरु'चा नारा

शेतकऱ्यांसोबतच्या सरकारच्या नवव्या बैठकीतही कोणता तोडगा निघू शकलेला नाही. शेतकऱ्यांनी आपली मागणी कायम ठेवत सरकारला काही तोडगा काढण्याची इच्छा नाही, असं म्हटलं आहे. सविस्तर बातमी-

2. राहुल गांधींनी मारला सनी देओलचा डायलॉग; 'तारीख पे तारीख'

शेतकरी आणि सरकारमधील तिढा कायम आहे. शेतकरी आणि सरकारमध्ये पुन्हा एकदा 15 जानेवारीला बैठक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी ट्विट करुन मोदी सरकारवर टीका केली आहे. सविस्तर बातमी-

3. संसदेत हिंसाचार सुरू असताना ट्रम्प कुटुंबीय सेलिब्रेशनमध्ये मग्न; व्हायरल व्हिडिओमुळे संताप

ट्रम्प समर्थक तोडफोड आणि मारहाण करत होते त्यावेळी ट्रम्प यांचे कुटुंबिय टीव्हीवर हे सर्व लाइव्ह बघत होते. याचाही एक व्हिडिओ व्हायरल झाला असून ट्रम्प यांच्या मुलानेच तो शूट केला आहे. सविस्तर बातमी-

4.गोसेखुर्द प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही 

राज्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या आढाव्याची सुरुवात आपण विदर्भापासून केली असून गोसेखुर्द हा महत्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल. अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.  सविस्तर बातमी-

5. पुण्यात अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग; पाहा कोठे कोठे झाला पाऊस 

गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण दिसत होते. गुरुवारी काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. पण शुक्रवारी (ता.8) दुपारी दोन तास पावसाने पुणे शहराला झोडपून काढले. दुपारी आलेल्या या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच धांदल उडाली होती.  सविस्तर बातमी- 

6. व्यवस्थापनशास्त्रातील आधारस्तंभ हरपला; डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांचे पुण्यात निधन

पुण्यात 'बी.कॉम.'चा अभ्यासक्रम आज मराठी भाषेतून शिकवला जातो, उत्तरपत्रिकासुद्धा मराठी भाषेमधून लिहिता येते, हे सारे डॉ. शेजवलकर यांच्या प्रयत्नांतूनच साध्य झाले. सविस्तर बातमी-

7. खुशखबर! रेल्वेनं घेतला महत्वाचा निर्णय; अखेर ९ महिन्यांनंतर प्रवाशांना मिळणार पैसे परत

रेल्वेसेवा २१ मार्चपासून पूर्णतः बंद राहिली. श्रमिक स्पेशल ट्रेन वगळता अन्य प्रवासी रेल्वे ३१ जुलैपर्यंत रद्दच राहिल्या. गाड्या रद्द करतानाच ऑनलाइन तिकिटांचा परतावा प्रवाशांना ऑनलाइन पद्धतीनेच मिळाला. सविस्तर बातमी-

8. रायगडमधील कुडपान गावातजवळ मोठा अपघात; लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक 300 फूट दरीत कोसळला

लग्नाचा वऱ्हाड घेऊन येणारा टेम्पो पोलादपुर तालुक्यातील कुडपण येथे खोल दरीत कोसलून झालेल्या अपघातात दोघेजण ठार झाले आहेत. ही घटना सायंकाळी 7.00 वाजताच्या दरम्यान झाली असल्याची प्राथमिक माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. सविस्तर बातमी-

9. Aus vs Ind 3rd Test Day 2: दिवसाअखेर भारत 2 बाद 96 धावा; अजिंक्य-पुजारा क्रिजमध्ये

रोहित शर्माने 77 चेंडूचा सामना करत 26 धावा केल्या. भारताच्या धावफलकावर त्यावेळी 70 धावा होत्या. त्यानंतर अर्धशतकी खेळी करुन शुभमन गिलही बाद झाला. 85 धावांवर भारताला दुसरा धक्का बसला. सविस्तर बातमी- 

10. पापलेट फोटोशुट ; समुद्र किनारी आशका झाली दिवानी... 

सध्या सोशल मीडियावर टेलिव्हिजन अभिनेत्री आशका गोराडियाचा फोटोशुट व्हायरल झाले आहे. तिचे ते फोटो पाहून त्यावर लाईक्स आणि कमेंटसचा पाऊस पडला आहे. सविस्तर बातमी- 

येथे वाचा- ब्रेकफास्ट अपडेट्स

येथे वाचा- दुपारच्या बातम्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer Protest rahul gandhi donald trump narendra modi america raigad sport