कर्जबाजारीपणाला कंटाळून बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

एक नजर

  • शेती व्यवसाय व कुटुंबाच्या उदरनि्वाहासाठी काढलेले कर्ज कसे फेडायचे या नैराश्येतून शेतकऱ्याची आत्महत्या
  • इंगळी (ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) येथील घटना
  • सर्जेराव परशुराम कोळी (वय 38) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव

मांजरी - शेती व्यवसाय व कुटुंबाच्या उदरनि्वाहासाठी काढलेले कर्ज कसे फेडायचे या नैराश्येतून इंगळी (ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) येथील युवा शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.  सर्जेराव परशुराम कोळी (वय 38) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याने शेतातील घरात आत्महत्या केली आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली.  

या घटनेची नोंद अंकली पोलीसात नोंद झाली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी, की मृत युवा शेतकऱ्याचे वडील परशुराम कोळी यांनी शेती व्यवसाय व घर कामासाठी विविध सहकारी   संस्थांमधून सुमारे दहा लाख रुपये कर्ज काढले. मात्र वडिलांनी केलेले कर्ज कशा पद्धतीने फेडायचे या नैराश्य भावनेतूनच सर्जेरावने आत्महत्या केली. अशी नोंद अंकली पोलीसात करण्यात आली आहे. 

Web Title: Farmer Suicide incidence in Ingali in Belgaum District