कर्जबाजारीपणाला कंटाळून बेळगाव जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून बेळगाव जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या

मांजरी - शेती व्यवसाय व काैटूंबिक कारणासाठी काढलेले सात लाख रुपयांचे कर्ज कसे फेडायचे या चिंतेतुन माजरी येथील युवा शेतकऱ्यांने आत्महत्या केली. रामदास नारायण खोत (वय 33) असे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

रामदास याने नैराश्येतून शेतातील घरात आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या घटनेची नोंद अंकली पोलीसात झाली असून पोलिस निरिक्षक गणपती कोगनोळे अधिक तपास करत आहेत. 

याबाबत समजलेली माहिती अशी की, मृत युवा शेतकऱ्याचे वडील नारायण खोत यांनी शेती व्यवसाय व घर कामासाठी विविध सहकारी संस्थांमधून सुमारे सात लाख रुपये कर्ज काढले होते. मात्र वडिलांनी केलेले कर्ज कशा पद्धतीने फेडायचे या नैराश्य भावनेतूनच रामदासने आत्महत्या केल्याची नोंद त्याची पत्नी अरुणा हिने अंकली पोलिसात दिली आहे. रामदास यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व दोन मुली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com