रिंगरोडच्या विरोधात बेळगाव परिसरातील शेतकरी एकवटले     

रिंगरोडच्या विरोधात बेळगाव परिसरातील शेतकरी एकवटले     

बेळगाव -  रिंगरोड करण्यास बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला असून शुक्रवारी रिंगरोडच्या विरोधात शेतकऱ्यांनी  जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन निवेदन दिले. 

निवेदन देतेवेळी शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत सुपीक जमीन न देण्याचा निर्धार व्यक्त केला, तसेच भु संपादनासाठी प्रयत्न करू नयेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा दिला दिला आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने बेळगाव शहराच्या सभोवताली रिंगरोड करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. धामणे, कमकारहट्टी, कोंडुस्कोप, मुतगा, मुचंडी, कलखांब, काकती, कडोली, आंबेवाडी, गोजगा, बाची, उचगाव, बेळगुंदी, नावगे, वाघवडे, सुळगे येळ्ळूर, यरमाळसह 29 गावातील सुपीक जमीन रिंगरोडसाठी संपादित केली जाणार आहे. याला महाराष्ट्र एकीकरण समितीने तीव्र विरोध केला असून रस्ता करण्यास विरोध कायम असून याबाबत न्यायालयीन लढा देण्याचा निर्धारही समितीने केला आहे.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकिकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, अरविंद पाटील, प्रकाश मरगाळे, एपीएमसी सदस्य आर के पाटील, युवा समिती अध्यक्ष संतोष मंडलिक, तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील, सुनील अष्टेकर, बी. डी. मोहनगेकर, कल्लाप्पा घाटेगस्ती, राजू मरवे, अॅड शाम पाटील, अॅड सुधीर चव्हाण उपस्थित होते.

पिकाऊ जमीन भु संपादित करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, रिंगरोड रद्द करा आदी घोषणा देऊन जिल्ह्याधिकारी कार्यालयाचा परिसर यावेळी दणाणून सोडण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com