दिल्लीत शेतकऱ्यांचा एल्गार; पोलिसांकडून बळाचा वापर

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

शेतकऱ्यांनी दिल्लीत मोठे आंदोलन पुकारले आहे. आपल्या मागण्यासाठी देशभरातील शेतकरी दिल्लीत रस्त्यावर उतरला आहे. भारतीय किसान युनियन हे आंदोलन करत आहे. ज्याला किसान क्रांती यात्रा असं नाव देण्यात आलं आहे. उत्तराखंडच्या हरिद्वारमधून या आंदोलनाला सुरवात झाली होती.

नवी दिल्ली- शेतकऱ्यांनी दिल्लीत मोठे आंदोलन पुकारले आहे. आपल्या मागण्यासाठी देशभरातील शेतकरी दिल्लीत रस्त्यावर उतरला आहे. भारतीय किसान युनियन हे आंदोलन करत आहे. ज्याला किसान क्रांती यात्रा असं नाव देण्यात आलं आहे. उत्तराखंडच्या हरिद्वारमधून या आंदोलनाला सुरवात झाली होती.

स्वामीनाथन आयोगासह अनेक प्रलंबित मागण्यासाठी शेतकऱ्यांनी लाँगमार्च काढला आहे, परंतु दिल्लीच्या सीमेवरच त्यांना रोखण्यात आले आहे. दिल्लीत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांबरोबर आरपीएफ, पॅलामिलीटरी फोर्ससुद्धा तैनात करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या सीमेवर पोलिसांनी किसान यात्रा रोखली आहे. पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. तसेच, पाण्याच्या फवाऱ्यांचा वापरदेखिल शेतकऱ्यांना थांबवण्यासाठी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांवर बळाचा वापर करण्यात आल्याने तणाव निर्माण झाला आहे.

दिल्लीजवळ उत्तरप्रदेशच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, प्रशासनाने या भागात आधीच जमावबंदी लागू केली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनासमोर एवढा मोठा पोलिस बंदोबस्त उभा केला आहे. शेतकरी हे काय दहशतवादी आहेत काय अशा भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. सरकारला आंदोलनाची पूर्ण कल्पना असूनदेखिल सरकार या प्रकरणात गाफील राहिले असल्याचे आरोपही शेतकऱ्यांकडून यावेळी करण्यात येत आहे. 

आंदोलनकर्त्यां शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या-
- 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना निवृत्तीवेतन द्यावे
- पंतप्रधान पीक विमा योजनेत बदल करण्यात यावा
- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लवकर देय रक्कम द्यावी
- स्वामिनाथन समितीचा अहवाल स्वीकारण्यात यावा
- उसाची देय रक्कम मिळण्यास उशीर झाल्यास त्यावर व्याज मिळावे
- शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी
- सिंचनासाठी मोफत वीजपुरवठा करण्यात यावा
- किसान क्रेडिट कार्डवर व्याजमुक्त कर्ज मिळावे
- भटक्या जनावरांपासून शेतीचे रक्षण करण्यासाठी व्यवस्था करावी
- सर्व पिकांची पूर्णपणे खरेदी व्हावी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers agitation in national Capital Delhi