किसान मोर्चा जंतर मंतरवर रोखला

राजकुमार चौगुले
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

हक्काच्या मागण्यांसाठी देशभरातील दोनशेहुन अधिक शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी लाखोच्या संख्येने उपस्थिती लावून सरकार विरोधी रोष प्रकट केला. दरम्यान संसदेला घेरावची परवानगी सरकारने नाकारली यामुळे मोर्चा जंतर मंतरवर रोखला गेला.

नवी दिल्ली - कर्जमुक्तीचा नारा देत देशभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी आज (शुक्रवारी) दिल्लीला धडक दिली. सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत रामलीला मैदान ते जंतर मंतर पर्यंतचा चार किलोमीटरचा मार्ग लाखो शेतकऱ्यामुळे भरून गेला होता.

हक्काच्या मागण्यांसाठी देशभरातील दोनशेहुन अधिक शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी लाखोच्या संख्येने उपस्थिती लावून सरकार विरोधी रोष प्रकट केला. दरम्यान संसदेला घेरावची परवानगी सरकारने नाकारली यामुळे मोर्चा जंतर मंतरवर रोखला गेला.

खासदार राजू शेट्टी, नर्मदा आंदोलनच्या नेत्या मेधा पाटकर, आदी सहित विविध भागातील शेतकरी नेत्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. येणाऱ्या निवडणुकीत मोदी सरकारला धडा शिकवण्याचे आवाहन केले. शेतकऱ्याला योग्य भाव मिळत नसल्याने देशात आत्महत्या होत आहेत. कर्जाने शेतकरी मोडकळीस आला आहे. याला सर्वस्वी केंद्र शासन जबाबदार असल्याचा आरोप यावेळी केला. सकाळच्या सत्रात शेतकरी संघटनांच्या नेत्यांची भाषणे झाली. दुपारच्या सत्रात राजकीय नेत्यांची भाषणे सुरू आहेत

Web Title: farmers agitation in New Delhi