बेळगावजवळ बायपासला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना अटक

bypass
bypass

बेळगाव : शेतकऱ्यांचा विरोध डावलून पोलिस बंदोबस्तात रस्ता करण्याचे काम बंद करण्यासाठी जमलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी शनिवारी सकाळी अटक केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून एकाचवेळी मोठ्या प्रमाणात बुलडोझर, जेसीबी व इतर मशिनरी लावून उभ्या पिकातून रस्ता करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी बुधवारी व गुरुवारी तीव्र विरोध करीत काम बंद पाडले होते. त्यामुळे शुक्रवारी काम बंद ठेवण्यात आले होते. मात्र शनिवारी अधिक प्रमाणात पोलिसांची कुमक मागवून रस्ताचे  काम हाती घेण्यात आले आहे.

शनिवारी सकाळी मोठ्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी विरोधाला सुरुवात करताच शेती बचाव समितीचे अध्यक्ष बाळाराम पोटे, देविदास चव्हाण पाटील, सुभाष लाड यांच्यासह इतर शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. अटक करतेवेळी विरोध शेतकऱ्यांनी विरोध केला मात्र पोलिसांनी शेतकऱ्यांना केली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ते 4 ए ला जोडण्यासाठी बायपास रस्त्याचा घाट घालण्यात आला आहे मात्र बायपास रस्त्यामुळे वडगाव, अनगोळ, शहापूर, हलगा शिवारासह इतर भागातील एक हजारहुन अधिक शेतकरी भूमिहीन होणार आहेत त्यामुळे बायपास रस्त्याला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध करीत न्यायालयात धाव घेतली आहे.

परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने पोलिस बंदोबस्तात काम सुरू केले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शिवारात जाऊन काम बंद पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शेतकऱ्यांनी दोन वेळा विरोध करीत रस्ता करण्यासाठी आणलेले जेसीबी, ट्रक व रोलरसह कर्मचाऱ्यांना पळवून लावले होते यावेळी शेतकरी व कर्मचारी यांच्यात वादावादीही  झाली होती. मात्र शेतकऱ्यांचा विरोध डावलून काम सुरू करण्यात आले आहे त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com