पाण्यासाठी त्यांनी स्वतःला जुंपले बैलगाडीला..

वृत्तसंस्था
शनिवार, 14 एप्रिल 2018

झामतुली (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशातील छत्रपूर जिल्ह्यातील झामतुली या गावात स्वच्छ पाण्याची वानवा आहे. गावातील विहीरात व पाण्याच्या स्त्रोतात अस्वच्छ आणि घाणेरडे पाणी आहे, जे की अजिबात पिण्यालायक नाही. पण या गावातील लोकांकडे दुसरा कोणताही पर्याय नाही.

स्वच्छ पाणी मिळावे यासाठी हे गावकरी कापडाने पाणी गाळून घेतात. या अस्वच्छ पाण्यामुळे गावकऱ्यांबरोबरच जनावरेही आजारी पडली आहेत. त्यामुळे पाणी वाहून नेण्यासाठी बैलगाडीला गावकरी स्वतः जुंपून पाणी वाहून नेत आहेत. 

चांगले पाणी मिळावे यासाठी गावकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली आहे. त्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी येऊन गावाची पहाणी केली व पाण्यासाठी बोअर कुठे काढता येईल याचे परिक्षण केले. तसेच गावात एक हातपंपही उभारण्यात येईल असा निर्णय तेथील अधिकाऱ्यांनी घेतला आहे.     

Web Title: Farmers Lug Around Carts In jhamtuli madhya pradesh