esakal | कृषी कायद्यांविरुद्ध तमिळनाडूचाही शड्डू
sakal

बोलून बातमी शोधा

farmer

कृषी कायद्यांविरुद्ध तमिळनाडूचाही शड्डू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चेन्नई : पंजाब, राजस्थान आणि अन्य राज्यांचा कित्ता गिरवताना तमिळनाडू सरकारनेही चेन्नई येथील शेतकरी संमेलनात केंद्र सरकारने तयार केलेल्या तिन्ही कृषी कायद्यांची अंमलबजावणी करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. देशातील सर्वच राज्यांनी हे कायदे नाकारावे म्हणून संपूर्ण देशभर ‘किसान स्वराज यात्रा’ सुरू होणार आहे.

ज्या राज्यांनी केंद्राचे तिन्ही कृषी कायदे अद्याप नाकारलेले नाहीत अशा सर्वच राज्यांमध्ये किसान स्वराज यात्रा जाईल. जागतिक अहिंसा दिन (२ ऑक्टोबर २०२१) पासून संविधान दिन (२६ नोव्हेंबर २०२१) पर्यंत ही यात्रा चालेल. देशातील विविध राज्यांतून प्रवास केल्यानंतर ही यात्रा थेट दिल्लीला धडक देईल.

या यात्रेदरम्यान शेतकरी आंदोलनादरम्यान मरण पावलेल्यांच्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना अभिवादन करण्यात येईल, त्याप्रमाणे युवा जोश, बेरोजगारी आणि जागतिक तापमानवाढीचे संकट याबाबत लोकांत जागृती करण्यात येईल. आंतरराष्ट्रीय किर्तीचे जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे.

loading image
go to top