'पीओके' क्या तुम्हारे बाप का है?- फारुख अब्दुल्ला

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली- पाकव्याप्त काश्मीर (पीओके) सध्या पाकिस्तानच्या ताब्यात असून, भारताचा त्यावर कोणताही अधिकार नाही. पुर्वजांकडून आलेल्या संपत्तीसारखा भारत दावा करू शकत नाही. 'पीओके' क्या तुम्हारे बाप का हे?, असा वादग्रस्त सवाल जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी आज (शुक्रवार) उपस्थित केला आहे.

चेनाब घाटी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी फारुख अब्दुल्ला यांच्यासह उमर अब्दुल्ला उपस्थित होते. यावेळी बोलताना फारुख अब्दुल्ला म्हणाले, 'पीओके'ला भारत जम्मू-काश्मीरचा अविभाज्य भाग समजत आहे. परंतु, 'पीओके' सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहे. 'पीओके' ही भारताची संपत्ती राहिलेली नाही. 'पीओके' क्या तुम्हारे बाप का है?

'काश्मीरच्या मुद्यावरून भारत सरकारजवळ पाकिस्तानसोबत चर्चा करण्याशिवाय कोणाताही मार्ग नाही. चर्चा व शांततेच्या माध्यमातूनच यामध्ये मार्ग निघू शकतो. भारताकडे एवढी ताकद नाही की पाकिस्तानच्या ताब्यातून 'पीओके' घेऊ शकू किंवा पाकिस्तानकडे एवढी ताकद नाही की ते काश्मीर घेऊ शकतात. दोन्ही देशांच्या वादामध्ये काश्मीरी नागरिक फसले आहेत. यामुळे शांततेच्या मार्गातून तोडगा काढायला हवा,' असेही फारुख अब्दुल्ला म्हणाले.

Web Title: farooq abdullah's statement on pok