हायवेवर चारचाकी घेऊन जाताय? तर मग हे वाचाच!

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

- केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून घेण्यात आला मोठा निर्णय.

पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून महामार्गावर (हायवे) येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांसाठी FasTag बंधनकारक करण्यात आला आहे. जर वाहनावर FasTag नसेल तर नियोजित रकमेपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. दुचाकी सोडून सर्व गाड्यांना FasTag अनिवार्य करण्यात आला आहे. याची अंमलबजावणी येत्या 1 डिसेंबरपासून केली जाणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

आपल्याकडे चारचाकी किंवा त्यापेक्षा मोठी गाडी असेल तर अशा वाहनांना FasTag गरजेचा असणार आहे. इतकंच नाही तर शाळेची व्हॅन असल्यासही याची आवश्यकता भासणार आहे. FasTag हा फक्त हायवेवर जाणाऱ्या वाहनांसाठीच नाहीतर बहुतांश वाहनांनाही आवश्यक आहे. इंधन पर्याय आणि सुरक्षित वाहन, मालकी इत्यादी कलमांच्या पालनासाठी FasTa आवश्यक करण्यात आला आहे.

महाविकासआघाडीला घेरण्यासाठी भाजपची नवी खेळी; राणेंना देणार ही जबाबदारी

शाळेच्या वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांनाही गरजेचे आहे. जर शाळेच्या वाहतूक करणाऱ्या वाहनांवर FasTag नसेल तर संबंधित शाळा संस्थावरही कारवाई केली जाणार आहे. 

FasTag म्हणजे नेमकं काय? 

- FasTag एक चीप असते जी तुमच्या कारच्या समोरील काचेच्या आतून लावली जाते. त्याच्यावर केलेल्या रिचार्जचा वापर करून तुम्ही टोल नाक्यावरून जाऊ शकता. त्यासाठी रांगेत थांबण्याची किंवा रोख पैसे देण्याची गरज नाही.

Image may contain: outdoor and text

टोल नाक्यावर असणार वेगळी लाईन

जे वाहनचालक FasTag चा वापर करतात, त्यांच्यासाठी टोल नाक्यावर वेगळी लाईन असणार आहे. या लाईनमध्ये इतर गाड्यांना (रोख टोल देणाऱ्या) गाड्यांना परवानगी नसणार आहे.

मोबाईलवर येणार मेसेज

जेव्हा तुम्ही टोल नाक्यावरून पोहचाल आणि टोलसाठी किती पैस कमी झाले हे जाणून घ्यायचे असेल तर पुढील 15 मिनिटांत तुम्हाला तुमच्या मोबाईलवर बँकेकडून मेसेज आणि मेलसुद्धा येईल. त्यानंतर तुम्हाला याबाबतची माहिती मिळेल. 

असा करा FasTag रिचार्ज

जर FasTag रिचार्ज करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला अकाउंट तयार करावे लागणार आहे. त्यामध्ये username आणि password तुम्हाला मिळेल आणि जेव्हा तुम्हाला रिचार्ज करायचे असेल तेव्हा तुम्ही कोणत्याही बँकेचे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डच्या माध्यमातून ऑनलाईन रिचार्ज करता येऊ शकते. 

5 वर्षांसाठी ग्राह्य

एकदा तयार झालेला FasTag नोंदणी झाल्यापासून 5 वर्षांसाठी ग्राह्य धरला जाणार आहे. या FasTag च्या माध्यामातून रिचार्ज करता येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FasTag will mandatory for All Vehicles excludes Two Wheeler