
श्रीनगर : भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केल्यानंतर सीमेपलीकडून झालेल्या तीव्र गोळीबारामुळे उत्तर काश्मीरमधील कुपवाडा येथील तंगधर आणि बारामुल्ला जिल्ह्यातील उरी या सीमेवरील भागात मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. यामुळे शेकडो कुटुंबे भीतीच्या सावटाखाली आहेत.