पवन वर्मा पक्ष सोडायला मोकळे - नितीशकुमार

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 24 January 2020

पवन वर्मा यांनी संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना भाजप आणि जेडीयू यांच्यातील युतीवरून टीका करणारे खुले पत्र लिहिले होते. त्यानंतर पक्षांतर्गत खदखदीबाबत चर्चा सुरू होती. त्यावर नितीशकुमार यांनी भूमिका स्पष्ट केली. ​

पाटणा - ‘पवन वर्मा यांना पक्ष सोडण्याची मुभा आहे. त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश करावा, मी त्यांना शुभेच्छा देतो,’’ असे प्रतिपादन बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पवन वर्मा यांनी संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना भाजप आणि जेडीयू यांच्यातील युतीवरून टीका करणारे खुले पत्र लिहिले होते. त्यानंतर पक्षांतर्गत खदखदीबाबत चर्चा सुरू होती. त्यावर नितीशकुमार यांनी भूमिका स्पष्ट केली. 

विशेष मुलाखत : आई- वडिलांनीच सेन्सॉर बोर्ड व्हावे : आशा पारेख

नितीश यांच्या विधानावर बोलताना पवन वर्मा म्हणाले, की जर दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपचा सर्वात जुना मित्र पक्ष सीएए आणि एनआरसीच्या प्रश्‍नांवरून साथ सोडू शकतो, तर जेडीयू का साथ सोडू शकत नाही, याचे उत्तर मला नितीश यांच्याकडून अपेक्षित होते. मात्र, मला अद्यापही उत्तर मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. पवन वर्मा यांच्या पत्राबाबत नितीशकुमार म्हणाले, ‘‘वर्मा यांच्या पत्राचा कुठलाही दबाव नाही. मी कधीच कुठल्याही दबावाखाली येत नाही. वर्मांनी आपले मत पक्षाच्या व्यासपीठावर पक्षाच्या नियमांनुसार मांडायला हवे होते. मात्र, त्यांनी चुकीचा पर्याय निवडला. त्यांच्या सर्वच प्रश्‍नांना उत्तर देता येणे शक्‍य नाही. त्यामुळे त्यांनी कुठल्याही दुसऱ्या पक्षात प्रवेश करावा, ते आपला निर्णय घेण्यास मोकळे आहेत.’’

अमर जवान ज्योतीला श्रद्धांजली वाहण्याची परंपरा पंतप्रधान मोडणार

नितीशकुमार यांच्या या वक्तव्यावरून पवन वर्मांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला गेल्याचे आता स्पष्ट झाले असून, पक्षाचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनादेखील बाहेरचा रस्ता दाखविण्यात येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येते आहे.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Feel free to leave Pawan Verma party