शबरीमलावर महिलांसाठी वयाचा पुरावा अनिवार्य

पीटीआय
गुरुवार, 4 जानेवारी 2018

अयप्पा स्वामी ब्रह्मचारी असल्याची मानले जात असल्याने मासिक पाळी येणाऱ्या वयातील महिलांना या मंदिरात प्रवेश बंदी आहे. ही बंदी झुगारून काही महिला मंदिरात प्रवेश करीत असल्याच्या घटना येथे घडत असतात. त्यामुळे सध्या यात्रा काळात महिलांसाठी वयाचा पुरावा दाखविणे बंधनकारक के आहे. येथे दरवर्षी तीन महिने यात्रा असते. ही यात्रा 15 नोव्हेंबरपासून सुरू होते व 14 जानेवारी रोजी "मकरविलक्कु' या सणानंतर समाप्त होते

तिरुअनंतपुरम - केरळमधील शबरीमला येथील अयप्पा मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या 10 ते 50 वर्ष वयोगटातील महिलांना आता वयाचा पुरावा जवळ बाळगणे अनिवार्य ठरणार आहे.

या मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या त्रावणकोर देवस्वम मंडळाने (टीडीबी) हा निर्णय घेतला आहे. अयप्पा स्वामी ब्रह्मचारी असल्याची मानले जात असल्याने मासिक पाळी येणाऱ्या वयातील महिलांना या मंदिरात प्रवेश बंदी आहे. ही बंदी झुगारून काही महिला मंदिरात प्रवेश करीत असल्याच्या घटना येथे घडत असतात. त्यामुळे सध्या यात्रा काळात महिलांसाठी वयाचा पुरावा दाखविणे बंधनकारक के आहे. येथे दरवर्षी तीन महिने यात्रा असते. ही यात्रा 15 नोव्हेंबरपासून सुरू होते व 14 जानेवारी रोजी "मकरविलक्कु' या सणानंतर समाप्त होते. मंदिराकडे जाताना शबरीमला टेकडीच्या पायथ्याशी पंपा येथे भाविकांची तपासणी केली जाते. त्या वेळी महिलांसाठी वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड व अन्ये प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येतील, असे "टीडीबी'चे अध्यक्ष ए. पद्मकुमार यांनी सांगितले. यामुळे महिला भाविकांशी पोलिस व देवस्थानच्या अधिकाऱ्यांमध्ये होणारी वादावादी टाळता येईल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, शबरीमला मंदिरात 10 ते 50 वर्षे वयोगटातील महिलांना प्रवेश न देण्याच्या प्रथेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

"परंपराबाबत तडजोड नाही'
देवस्थानच्या या निर्णयाचे समर्थन करताना पद्मकुमार म्हणाले की, काही दिवसांपूर्वी तमिळनाडूतून एक मुलगी वडील व काही नातेवाईकांसह शबरीमलाला दर्शनासाठी आली होती. त्या वेळी तपासणी कर्मचाऱ्याला तिच्या वयाविषयी शंका आली. ती लहान असल्याचा दावा वडिलांनी केला, मात्र सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिला दर्शनाची परवानगी दिली नाही. शेवटी ओळखपत्र सादर केले असता तिचे वय 11 वर्षे असल्याचे निदर्शनास आले. देवस्थानच्या परंपराबाबत आम्ही कधीही तडजोड करीत नाही.

Web Title: Female Devotees Need to Carry Age Proof to Offer Prayers in Sabarimala