मुख्यमंत्री केजरीवालांचे धरणे आंदोलन पाचव्या दिवशीही सुरूच!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 जून 2018

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने आज (शुक्रवार) सलग पाचव्या दिवशी धरणे आंदोलन चालू ठेवले आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयात केजरीवाल आणि सहकारी आंदोलन करत आहेत. 

केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याला मारहाण झाली होती. याविरोधात दिल्लीतील 'आयएएस' अधिकाऱ्यांनी संप पुकारला आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. हा संप मागे घेण्यासाठी बैजल यांनी मध्यस्थी करावी, अशी मागणी करत केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारपासून नायब राज्यपालांच्या कार्यालयात धरणे आंदोलन सुरू केले आहे. 

यावरूनही तोडगा निघत नसल्याचा दावा करत केजरीवाल यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही साकडे घातले. 'दहा लाख दिल्लीकरांच्या स्वाक्षरीचे पत्र आम्ही पंतप्रधान मोदी यांना पाठविणार आहोत', असेही केजरीवाल यांनी सांगितले. 

'आम्ही गेले चार दिवस राज्यपालांच्या कार्यालयातच बसलो आहोत; पण चार मिनिटांचीही भेटण्याची वेळ मिळालेली नाही. पंतप्रधान मोदी यात लक्ष घालतील, अशी अपेक्षा आहे', असे 'आप'च्या सत्येंद्र जैन यांनी ट्विट केले.

Web Title: Fifth day of Arvind Kejriwal’s sit-in protest