लढाऊ विमाने उतरली महामार्गावर

पीटीआय
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

बंगारमाऊ (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे स्वप्न असलेल्या आणि भारतीय हवाई दलाची विमानेही उतरण्याची क्षमता असलेल्या आग्रा-लखनौ द्रुतगती महामार्गाचे आज उद्‌घाटन झाले.

समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला या प्रकल्पाचे उद्‌घाटन झाल्याने पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

बंगारमाऊ (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे स्वप्न असलेल्या आणि भारतीय हवाई दलाची विमानेही उतरण्याची क्षमता असलेल्या आग्रा-लखनौ द्रुतगती महामार्गाचे आज उद्‌घाटन झाले.

समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला या प्रकल्पाचे उद्‌घाटन झाल्याने पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

समाजवादी पक्षाच्या सरकारच्या विकासाचे प्रारूप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महामार्गावर हवाई दलाची लढाऊ विमानेही उतरली आणि महामार्गाच्या क्षमतेचे प्रात्यक्षिक दाखविले. मुख्यमंत्री यादव आणि मुलायमसिंह यादव यांनी या प्रकल्पासाठी काम केलेल्या सर्वांचे कौतुक केले.

या वेळी मुलायमसिंह म्हणाले, 'या महामार्गाचे भूमिपूजन करताना तो किती वर्षांत पूर्ण होईल, असे मी विचारले होते. चार वर्षे असे सांगितल्यावर मी भूमिपूूजन करण्यास नकार दिला. बावीस महिन्यांमध्ये पूर्ण होण्याची ग्वाही मिळाल्यावरच मी भूमिपूजन केले. आज परिणाम तुमच्यासमोर आहे. हा महामार्ग दोन वर्षांत पूर्ण झाला आहे.''

'उत्तर प्रदेश सरकारमध्ये कोणतेही काम नियोजित वेळेच्या पूर्वीच पूर्ण करण्याची क्षमता आहे. यापूर्वी दिल्लीला पोचण्यासाठी 12 ते 14 तास लागत असत. आता त्यापेक्षा कितीतरी कमी वेळात हे अंतर पूर्ण होईल,'' असे अखिलेश यांनी सांगितले. हा महामार्ग दिल्लीला जोडला जाणार असून, पुन्हा सत्तेत आल्यावर याचा आणखी विस्तार केला जाणार असल्याचेही ते म्हणाले. या महामार्गावर उद्योग, पेट्रोल पंप आणि इतर उपयुक्त गोष्टींचेही नियोजन केले आहे. अखिलेश यांनी हवाई दलाचे आभार मानले. मायावती यांनी मात्र घाईघाईने तयार केलेल्या या महामार्गावर अद्यापही वाहतूक सूचना नसल्याने तो धोकादायक असल्याची टीका केली.

विकासाच्या महामार्गावर...
- 302 किलोमीटर - एक्‍स्प्रेस वेची लांबी
- 6 - एक्‍स्प्रेस वेवरील मार्गिका
- खर्च - 13 हजार कोटी रुपये
- 3.5 तास - लखनौ-आग्रा प्रवासाला लागणारा वेळ
- 5 ते 6 तास - लखनौ-दिल्ली प्रवासाला लागणारा वेळ
(हे अंतर 556.7 किलोमीटर असून, ते पार करण्यासाठी सध्या ताज/यमुना एक्‍स्प्रेस वेने आठ तास लागतात)
- 23 महिने - काम पूर्ण करण्यास लागलेला कालावधी
- 10 जिल्हे, 232 गावांतून जाणारा एक्‍स्प्रेस वे
- 3500 हेक्‍टर - एक्‍स्प्रेस वेसाठी जमिनीचे संपादन
- 30 हजार 456 - शेतकऱ्यांची एक्‍स्प्रेस वेसाठी सहमती
- एक्‍स्प्रेस वेच्या दोन्ही बाजूंना तीन लाख झाडे लावणार
- मार्ग - आग्रा-फिरोजाबाद-मैनपुरी-इटावा-औरिया-कनोज-हरदोई-कानपूर नगर-उन्नाव-लखनौ

Web Title: Fighter planes landed on the highway