esakal | तुम्ही आघाडी केली तर चालते, आम्ही केलं की अँटी नॅशनल?; मेहबुबा मुफ्तींचा पलटवार
sakal

बोलून बातमी शोधा

amit shah and mehbooba mufti

शहांच्या या ट्विटनंतर काही मिनिटातच पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

तुम्ही आघाडी केली तर चालते, आम्ही केलं की अँटी नॅशनल?; मेहबुबा मुफ्तींचा पलटवार

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकापाठोपाठ तीन ट्विट करत गुपकार आघाडीवर टीका केली होती. शहांच्या या ट्विटनंतर काही मिनिटातच पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मुफ्ती म्हणाल्यात की, भाजप त्यांना अॅटी नॅशनल असल्यासारखं प्रोजक्ट करत आहे. भाजप आपल्या सत्तेच्या भूकेसाठी आघाडी बनवते, पण आम्ही जेव्हा यूनायटेड फ्रंड बनवतो तेव्हा ते राष्ट्रहिताला आव्हान ठरते का? असा सवाल त्यांनी केला आहे. 

मेहबुबा काय म्हणाल्या?

अमित शहांचे ट्विट रिट्विट करत जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती म्हणाल्यात की, ''जून्या सवयी जात नाहीत. भाजपने पूर्वी तुकडे तुकडे गँग भारताच्या एकतेला धोका असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता गुपकार आघाडीचा वापर करत आम्हाला अँटी नॅशनल दाखवले जात आहे. भाजप स्वत: दिवस-रात्र संविधानाचे उल्लंघन करत असते.'' 

मुफ्ती म्हणाल्या की, ''स्वत:ला तारणहार आणि राजकीय विरोधकांना देशविरोधी म्हणण्याची भाजपची चाल जूनी झाली आहे. वाढती बेरोजगारी, महागाई या मुद्द्यांऐवजी आता जिहाद, तुकडे तुकडे आणि आता गुपकार गँगवर राजकीय चर्चा होत आहे.'' आघाडी करुन निवडणूक लढणेही आता अँटी नॅशनल झाले आहे. भाजप सत्तेच्या भुकेपोटी अनेक आघाड्या करत असते, पण आम्ही उभारलेले नॅशनल फ्रंट त्यांना देशविरोधी वाटतं, असंही त्या म्हणाल्या.

दरम्यान, गुपकार आघाडीला 'गुपकार गँग' संबोधत काहींना जम्मू-काश्मीरमध्ये विदेशी शक्तींचा हस्तक्षेप हवा आहे, असं अमित शहा म्हणाले होते. गुपकार गँग भारताच्या तिरंग्याचा अपमान करते. सोनिया गांधी आणि राहुल गांधी गुपकार गँगच्या अशा कृतींचे समर्थन करतात का? त्यांनी आपली भूमिका देशाच्या जनतेसमोर ठेवली पाहिजे. जम्मू-काश्मीर नेहमीच भारताचा अविभाज्य भाग राहिला आहे. भारताचे लोक कधीही देशहिताविरोधात बनलेल्या अपवित्र 'ग्लोबल आघाडी'ला स्वीकार करणार नाही. गुपकार गँग देशाच्या मूडनुसार पुढे चालली तर ठिक नाहीतर त्यांना लोक बुडवतील, असं शहा म्हणालेत.