पणजी आरोग्य संचालनालयात हाणामारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

कोणी कोणावर प्रथम हल्ला केला हे अद्याप स्पष्ट झालेले नसून डॉ. दळवी यांना पणजी पोलिसांनी तपासणीसाठी गोवा वैद्यकीय इस्तिपळात (गोमेकॉ) नेले आहे. 

पणजी - आरोग्य संचालनालयाचे संचालक डॉ. संजीव दळवी आणि काणकोणमधील डॉ. व्यकंटेश आर यांच्यात शाब्दिक चकमकीनंतर झालेल्या झटापटीत एकमेकांना मारहाण करण्यात आली. कोणी कोणावर प्रथम हल्ला केला हे अद्याप स्पष्ट झालेले नसून डॉ. दळवी यांना पणजी पोलिसांनी तपासणीसाठी गोवा वैद्यकीय इस्तिपळात (गोमेकॉ) नेले आहे. 

कंत्राटी तत्त्वावर काणकोण येथील इस्पितळांमध्ये केलेल्या डायलिसिस चाचणीचे बिल आरोग्य संचालनाकडून देणे बाकी असून गेल्या अनेक वर्षांपासून मी या बिलाची चौकशी करण्यासाठी आरोग्य संचालनालयात येतो. यावेळेस मी येथे आलो असता प्रथम दळवी यांनी माझ्यावर हल्ला केला आणि त्यामुळे मी त्यांच्यावर उलट हल्ला केला असल्याची माहिती डॉ. व्यंकटेश राव यांनी माध्यमांना दिली. 

या झटापटीत डॉ. व्यंकटेश आर यांनी पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारल्याने त्यांचा पाय मोडला आहे. सध्या त्यांनाही गोमेकॉत नेण्यात आले असून या प्रकरणाबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Fighting In Panaji Health Directorate