गोव्यात 25 मे पासून चित्रपट महोत्सव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

पणजी - गोवा मनोरंजन संस्थेने चित्रपट महोत्सव संचालनालयाच्या सहकार्याने राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. हा महोत्सव 25 मे ते 7 जून या कालावधीत होणार असून महोत्सवात राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त एकूण 23 चित्रपट दाखविण्यात येणार असल्याची माहिती इएसजीचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी पत्रकारपरिषदेत दिली. 

महोत्सवाचे उद्‌घाटन 25 मे रोजी सायंकाळी 6 वाजता 'कच्चा लिंबू'चे दिग्दर्शक प्रसाद ओक आणि 'पावसाचा निबंध'चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या उपस्थितीत या दोन्ही नॉन फिचर चित्रपटांच्या प्रदर्शनाने होणार आहे. तर समारोप व्हिलेज रॉकस्टार या चित्रपटाने होणार आहे.

प्रत्येक चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्या चित्रपटातील कलाकारवर्ग अथवा दिग्दर्शकांनाही प्रत्येक चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर संवाद साधता येणार असल्याची माहिती यावेळी दिली. 

या महोत्सवामध्ये मॉम (हिंदी), आलोरूक्‍कम (मल्याळम), नगरकिर्तन (बंगाली), सिंजार (जसारी), न्यूटन (हिंदी), म्होरक्‍या (मराठी), धहह(गुजराथी), पड्‌डायी (तुलू), हॅलो अर्शी (ओडीया), वॉकिंग विथ द वाइंड (लडाखी), हिबेट रमाक्‍का (कन्नड), घाझी (तेलगु), टेक ऑफ (मल्याळम), टु लेट(तमीळ), इरादा (हिंदी), धप्पा (मराठी), वॉटरबेबी (इंग्रजी आणि कोकणी), इशू (असामी) आणि मयीराक्षी (बंगाली) इ. भाषेत चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. हा महोत्सव सिनेफाईल सदस्यांसह सर्वांसाठी खुला असणार आहे.

Web Title: Film festival in Goa on 25th May