मोदी समर्थकाने ट्विटरवरून दिली बलात्काराची धमकी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 मे 2019

नरेंद्र मोदी सर, विजयासाठी शुभेच्छा. सर, आम्हालाही सांगा की, तुमच्या त्या समर्थकांशी कसे वागावे, जे या विजयाचा जल्लोष माझ्या मुलीला धमकी देऊन करत आहे, कारण मी तुमचा विरोधी आहे?

मुंबई : एका मोदी समर्थकाने ट्विटरवरून अश्लिल मजकूरासह बलात्कार करण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मुलीला बलात्काराची धमकी दिली असून, अनुराग कश्यपने त्याच्या धमकीच्या ट्वीटचा स्क्रीन शॉट शेअर केला आहे.

दिग्दर्शक अनुराग कश्यप हे विविध मुद्द्यावर सविस्तरपणे मत व्यक्त करतात. चित्रपटासह राजकीय घडामोडींवरही मत व्यक्त करत असल्यामुळे अनेकदा ते ट्रोल होताना दिसतात. लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर एका मोदी समर्थकाने अनुराग यांच्या मुलीबाबत अश्लिल कमेंट करत मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली आहे. अनुराग यांनी त्या ट्वीटचा स्क्रीनशॉट शेअर करुन नरेंद्र मोदी यांना विचारले आहे की, "नरेंद्र मोदी सर, विजयासाठी शुभेच्छा. सर, आम्हालाही सांगा की, तुमच्या त्या समर्थकांशी कसे वागावे, जे या विजयाचा जल्लोष माझ्या मुलीला धमकी देऊन करत आहे, कारण मी तुमचा विरोधी आहे?"

दरम्यान, अनुराग कश्यप यांच्या ट्विटवर अनेकांनी मत नोंदवताना या घटनेचा निषेध केला आहे. कश्यप सध्या 'सांड की आंख' हा चित्रपट करत आहेत. या चित्रपटात भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Filmmaker Anurag Kashyap daughter rape threat by Modi Supporters