संसदेच्या अर्थविषयक समितीवर डॉ. मनमोहनसिंग यांची नियुक्ती 

पीटीआय
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

राज्यसभेचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीच्या सदस्यपदी माजी पंतप्रधान आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहनसिंग यांची नियुक्ती केली आहे. संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीचे सदस्य असलेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी डॉ. मनमोहनसिंग यांच्यासाठी सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. आता दिग्विजयसिंह यांची नियुक्ती संसदेच्या शहर विकासविषयक स्थायी समितीच्या सदस्यपदी करण्यात आली आहे.

कॉंग्रेस खासदार दिग्विजयसिंह "शहरविकास'चे सदस्य 
नवी दिल्ली - राज्यसभेचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीच्या सदस्यपदी माजी पंतप्रधान आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहनसिंग यांची नियुक्ती केली आहे. संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीचे सदस्य असलेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी डॉ. मनमोहनसिंग यांच्यासाठी सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. आता दिग्विजयसिंह यांची नियुक्ती संसदेच्या शहर विकासविषयक स्थायी समितीच्या सदस्यपदी करण्यात आली आहे. 

दोन वेळा पंतप्रधानपद भूषविलेल्या डॉ. मनमोहनसिंग यांनी 1991 ते 1996 या कालावधीमध्ये देशाच्या अर्थमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. सप्टेंबर 2014 पासून ते मे 2019 पर्यंत ते संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीचे सदस्य होते. जूनमध्ये त्याचा राज्यसभेतील कार्यकाळ पूर्ण झाला होता. डॉ. मनमोहनसिंग यांची ऑगस्टमध्ये पंजाबमधून पुन्हा राज्यसभेवर निवड झाली आहे. त्यामुळे त्यांची पुन्हा अर्थविषयक स्थायी समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे, असे सांगण्यात आले. 

डॉ. मनमोहनसिंग हे सदस्य असताना अर्थविषयक स्थायी समितीपुढे नोटाबंदी आणि जीएसटीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर मंथन झाले होते. त्या वेळी डॉ. मनमोहनसिंग यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finance Committee of Parliament Appointment of Manmohan Singh