esakal | राहुल गांधींवर भडकल्या अर्थमंत्री; म्हणाल्या हे तर ड्रामेबाज
sakal

बोलून बातमी शोधा

Finance Minister angry with Rahul Gandhi Said he Misleading

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजवर आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्यावर चांगल्याच भडकल्या. राहुल गांधी हे ड्रामेबाज असल्याचे त्यांनी म्हटले.

राहुल गांधींवर भडकल्या अर्थमंत्री; म्हणाल्या हे तर ड्रामेबाज

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजवर आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्यावर चांगल्याच भडकल्या. राहुल गांधी हे ड्रामेबाज असल्याचे त्यांनी म्हटले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

निर्मला सीतारामन यांनी म्हटले की, 'राहुल गांधी यांनी मजूरांसोबत बसून फोटो काढले, त्यांच्यासोबत बोलून एकप्रकारे त्यांनी आपला वेळ वाया घालवला आहे. राहुल गांधी यांनी मजूरांसोबत काहीवेळ तरी चालायला हवे होते. मजूरांच्या मुलांसोबत डोक्यावरून सामान वाहायला हवं होतं, असेही सीतारामन म्हणाल्या आहेत. ज्या ठिकाणी काँग्रेसचे सरकार आहे, त्या सरकारला सांगून राहुल गांधी अधिकच्या रेल्वेगाड्या मागवून मजूरांना घरी पोहोचवू शकतात. पण, ते तसे करणार नाहीत. सोनिया गांधी यांनाही माझे आवाहन असून स्थलांतर करत असलेल्या मजूरांना काँग्रेस सरकार असलेल्या राज्यांनी योग्य ती वागणूक दिली पाहिजे.
------------
काँग्रेसच्या मनरेगा रोपट्याला केंद्राकडून संजीवनी
-----------
आता टाटास्काय आणि एअरटेल डिश टीव्हीवर भरणार शाळा; अर्थमंत्र्यांची घोषणा
-----------
मोठी बातमी : आत्मनिर्भर भारत-५  अर्थमंत्र्यांच्या 7 महत्त्वाच्या घोषणा
----------
पत्रकार परिषदेत काँग्रेससंबधित प्रश्न विचारले असता अर्थमंत्री म्हणाल्या की, जिथे काँग्रेसचे किंवा त्यांच्या मित्रपक्षाचे सरकार आहे, तिथे काँग्रेसने मदतीचा हात पुढे करायला हवा. तेथून जास्तीच्या रेल्वेगाड्या चालू करून मजूरांना आपाआपल्या घरी पोहोचवण्याची जबाबदारी घ्यायला हवी. परंतु, असे न करता त्यांच्या राज्यातूनही मजूर पायी जाताना दिसत असल्याचे अत्यंत विदारक चित्र असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
-----------
पुण्यात कोरोनाचा कहर; एका दिवसात आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण
-------
पुणे शहराच्या किमान तापमानात झाली वाढ; पुढील सहा दिवस...
------
दरम्यान, आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. त्यानंतर पाच टप्प्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विविध क्षेत्रांसाठीच्या तरतूदींची घोषणा केली आहे. विविध क्षेत्रांना आणि घटकांना करण्यात आलेल्या एकूणम २० लाख कोटी रुपयांच्या मदतीची विभागणीसुद्धा अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केली.