#अर्थसंकल्प2017: रेल्वे रुळ ओलांडण्याची पद्धत बंद करणार

टीम ई सकाळ
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

आमच्या सरकारकडून लोकांना मोठ्या अपेक्षा आहेत. सरकारने महागाई नियंत्रणात ठेवली आहे. काळया पैशाविरोधात सरकार लढाई सुरुच ठेवणार आहे.
- अरूण जेटली, अर्थमंत्री

नवी दिल्ली : '2020 पर्यंत रेल्वे रुळ ओलांडण्याची पद्धत बंद करणार' असा संकल्प अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आर (बुधवार) मांडला. 

काळ्या पैशाविरुद्ध आघाडी उघडत पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करत, देशाला डिजिटल व्यवहारांच्या दिशेने नेण्याच्या नरेंद्र मोदी सरकारच्या निर्णयानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (बुधवारी) केंद्रीय अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्प स्वतंत्रपणे मांडण्याऐवजी केंद्रीय अर्थसंकल्पाचा भाग म्हणून मांडण्याची प्रथाही सुरू झाली आहे.

अर्थसंकल्पातील प्रमुख वैशिष्ट्ये :

 • रेल्वेच्या स्वतःच्या स्त्रोतांमधून अधिक निधी उभारण्याचा संकल्प
 • देशभरात 100 स्कील सेंटर सुरु करणार
 • उच्च शिक्षणासाठी युजीसीमध्ये बदल करणार
 • माध्यमिक शिक्षणात नाविन्यासाठी निधी देणार
 • गाव इंटरनेटने जोडण्यासाठी डिजीगाव योजना सुरु करणार
 • 1 लाख 50 हजार ग्रामपंचायती हॉटस्पॉटने जोडणार
 • मायक्रो सिंचन निधीसाठी ५ हजार कोटींची तरतूद
 • महामार्गांसाठी 64 हजार 900 कोटींचा निधी
 • सर्व प्रकारच्या वाहतूक मार्गांच्या विकासासाठी 2 लाख 41 हजार 347 कोटींची तरतूद
 • पायाभूत सुविधांसाठी 3 लाख 96 हजार कोटींची विक्रमी तरतूद
 • थेट परकीय गुंतवणूक अॅटोमॅटिक रुट पद्धतीने येणार
 • पीपीपी मॉडेल छोट्या शहरांमध्ये विमानतळ उभारणार
 • 1 लाख 31 हजार कोटींचा रेल्वे अर्थसंकल्प
 • रेल्वे सुरक्षेसाठी एक लाख कोटींचा निधी
 • 2020 पर्यंत रेल्वे रुळ ओलांडण्याची पद्धत बंद करणार
 • 25 रेल्वे स्थानकांवर सरकते जिने आणि लिफ्टची सोय
 • 3500 किलोमीटरचे नवे लोहमार्ग उभारणार
 • 2019 पर्यंत सर्व रेल्वेमध्ये बायोटॉयलेट सुरु करणार
 • ई-तिकीट खरेदीवर सर्व्हिस चार्ज लागणार नाही
 • 7 हजार रेल्वे स्थानकांवर सोलर प्रकल्प सुरु करणार
 • कुष्ठरोग व गोवर रोग समूळ नष्ट करणार
 • 2025 पर्यंत टीबी रोगाचा पूर्णपणे नायनाट करणार
 • डॉक्टरांची संख्या वाढविण्यासाठी प्रवेशसंख्या वाढविणार
 • झारखंड आणि गुजरातमध्ये एम्स सुरु करणार
 • ज्येष्ठ नागरिकांसाठी एलआयसीकडून आठ टक्के व्याजदराची योजना
 • वैद्यकीय आणि आयआयटी प्रवेश परीक्षेसाठी नवी प्रक्रिया सुरु करणार
 • ज्येष्ठ नागरिकांसाठी आधारशी संलग्न हेल्थकार्ड देणार
 • 5 लाख शेततळ्यांचे उद्धीष्ट होते जे पूर्ण झाले, 10 लाख शेततळ्यांचे उद्दीष्ट मार्च महिन्यात पूर्ण करू
 • 60 टक्के गावांमध्ये शौचालये उभारली
 • 2018 पर्यंत प्रत्येक गावात वीज पोचविणार
 • विजेसाठी 4,500 हजार कोटींची तरतूद
 • पंतप्रधान कौशल्या विकास केंद्र आता 600 जिल्ह्यांमध्ये सुरु करणार
 • तरुणांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी स्वयंम नावाची योजना सुरु करणार
 • संकल्प प्रकल्पासाठी 60 हजार कोटींची तरतूद, या योजनेद्वारे तरुणांना रोजगार प्रशिक्षण
 • कापड उद्योगाप्रमाणे लेदर आणि फुटवेअरसाठी विशेष रोजगार योजना
 • पाच विशेष पर्यटन क्षेत्रे विकसित करणार
 • गर्भवती महिलांना 6 हजार रुपये मदत देणार
 • 600 जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान कौशल्य विकास केंद्र उभारणार
 • वसंत पंचमीच्या शुभ मुहुर्तावर अर्थसंकल्प सादर करत आहे
 • काळ्या पैशाविरुद्धच्या लढाईत नागरिकांनी आम्हाला मदत केली
 • काळयापैशा विरोधात सरकार लढाई सुरुच राहणार 
 • नोटाबंदील सहकार्य केल्याबद्दल देशवासियांचे आभार
 • आमच्या सरकारकडून लोकांना मोठ्या अपेक्षा आहेत
 • सरकारने महागाई नियंत्रणात ठेवली आहे
 • मंदावलेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे सरकारकडून प्रयत्न
 • सरकारच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल
 • गेल्या काही वर्षांत परदेशी गुंतवणुकीत वाढ झाली
 • डाळीचे उत्पादन वाढ होईल, त्यामुळे दरावर नियंत्रण राहिल
 • परदेशी चलनसाठ्यातही मोठी माठ झाली
 • जगभरात मंदी असताना देशात भरभराटीचे चित्र
 • उत्पादन क्षेत्रात जगात भारताचा सहावा क्रमांक
 • जीएसटीला मंजुरी मिळाल्याबद्दल जीएसटी समितीचे आभार
 • प्रत्येक घटकापर्यंत फायदा पोचविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे
 • नोटाबंदीचा निर्णय धाडसी 
 • दहशतवादी कृत्ये व भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी महत्त्वाचा निर्णय
 • गेल्या काही वर्षांत परदेशी गुंतवणुकीत वाढ झाली
 • डाळीचे उत्पादन वाढ होईल, त्यामुळे दरावर नियंत्रण राहिल
 • परदेशी चलनसाठ्यातही मोठी माठ झाली
 • जगभरात मंदी असताना देशात भरभराटीचे चित्र
 • उत्पादन क्षेत्रात जगात भारताचा सहावा क्रमांक
 • जीएसटीला मंजुरी मिळाल्याबद्दल जीएसटी समितीचे आभार
 • प्रत्येक घटकापर्यंत फायदा पोचविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे
 • नोटाबंदीचा निर्णय धाडसी 
 • दहशतवादी कृत्ये व भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी महत्त्वाचा निर्णय
 • नोटाबंदीचे वाईट परिणाम वर्षभर असतील
 • देशातील चलन तुटवडा लवकरच संपेल
 • बँकांची कर्जे स्वस्त करण्याचा सरकारचा प्रयत्न
 • नोटाबंदीमुळे सरकारी महसुली वसुलीला फायदा झाला
 • कर भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ
 • करचुकवेगिरीमुळे देशातील नागरिकांचे मोठे नुकसान
 • 2017 मध्ये एकूण देशांतर्गत उत्पन्नामध्ये वाढ होईल
 • प्रत्येक नागरिकाला घर देण्याचा आमचा प्रयत्न आहे
 • गरिबी निर्मुलन आणि पायाभूत सुविधांमध्ये वाढ यावर भर देण्यात येणार
 • ग्रामीण भागासाठी अर्थसंकल्पात जास्त तरतूद
 • रेल्वे अर्थसंकल्प यामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय ऐतिहासिक, मात्र, स्वायत्तता कायम राहणार
 • कच्च्या तेलाच्या किंमती आणि पेट्रोलच्या किंमती कमी होण्याची शक्यता
 • टेक इंडिया हा सरकारचा आगामी काळातील अजेंडा
 • तरुणांना रोजगार आणि नोकऱ्या देण्याचा सरकारचा प्रयत्न
 • प्रत्येक योजनेत गरिब जनतेचा विचार
 • खरीप आणि रब्बीच्या क्षेत्रात यंदा वाढ झाली
 • शेतकऱ्यांसाठी 10 लाख कोटींचे कृषीकर्ज उपलब्ध करू
 • नाबार्डसाठी 20 हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देणार
 • पाच वर्षात उत्पन्न दुप्पट करणार
 • शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी सरकारचे प्रयत्न
 • कृषी विकासदर 4.1 टक्के राहिल असा अंदाज
 • दूध प्रकिया उद्योगांसाठी 8 हजार कोटींची तरतूद
 • पीक विम्यासाठी 9 हजार कोटी उपलब्ध करून देणार
 • ग्रामीण भागासाठी 3 लाख कोटींची तरतूद
 • 2019 पर्यंत 50 हजार ग्रामपंचायती गरिबीमुक्त करणार
 • मनेरगासाठी 48 हजार कोटींची तरतूद
 • 1 कोटी कुटुंबे गरिबीमुक्त करण्याचे ध्येय
 • पंतप्रधान रस्ते योजनेंतर्गत दिवसाला 133 किमी रस्ते उभारले
 • ग्रामसडक योजनेसाठी 19 हजार कोटींची तरतूद
 • या योजनेला राज्य सरकारे 8 हजार कोटी देणार

-----------------------------------
कोट
आमच्या सरकारकडून लोकांना मोठ्या अपेक्षा आहेत. सरकारने महागाई नियंत्रणात ठेवली आहे. काळया पैशाविरोधात सरकार लढाई सुरुच ठेवणार आहे.
- अरूण जेटली, अर्थमंत्री

Web Title: Finance minister Arun Jaitly presents Union Budget 2017