१५ सेकंदाचं चॅलेंज , फोटोतील साप शोधून दाखवाच...

प्राजक्ता निपसे
Thursday, 16 July 2020

या फोटोतील साप शोधण्यासाठी तीक्ष्ण डोळे आणि एकाग्रतेची गरज आहे.

साप म्हटलं की खूपजणांना भीती  वाटते. तसेच  सापांच्या विविध अशा प्रजाती आहेत. जे निसर्गाच्या सानिध्यात उघडपणे फिरत असले तरी प्रत्येक माणसाच्या नजरेला दिसून येत नाहीत. जरी नजर पडली तरी तो ओळखू येत नाही. मग तुम्हाला कोणी साप शोधायला सांगितलं तर . मग जर तुम्हाला चॅलेंज स्वीकारायचं असेल तर दिलेल्या फोटोला निरखून पाहा आणि १५ सेकंदात साप कुठे लपलाय ते शोधून दाखवा. 

या फोटोत एक साप आहे, जो झाडांच्या सुकलेल्या पानांमध्ये आहे. अनेक लोकांनी प्रयत्न करुन पाहिले, पण १५ सेकंदात कोणालाच  हा साप शोधता आला नाही. या फोटोतील साप शोधण्यासाठी तीक्ष्ण डोळे आणि एकाग्रतेची गरज आहे.

तुम्ही जर का हा फोटो पहिला तर या फोटोतील साप तुम्हाला दिसून येईल. हा फोटो एक ट्विटर युजर्स @dm_ynwa ने शेअर केला आहे. त्याखाली कॅप्शन लिहिली आहे की, १५ सेकंदात साप शोधा, अनेक युजर्सने प्रयत्न करुनही त्यांना साप दिसला नाही. अनेकांनी कमेंटमध्ये सुद्धा फोटो बघून त्याच उत्तर दिलं आहे, जसेकी मग तुम्हाला दिसला का साप ? 

हेही वाचा : रॅपिड अँटीजेन, अँटीबॉडी आणि आरटीपीसीआर चाचण्या तुम्हाला माहित आहे का ? 

कारण १५ सेकंद तर कधीच झाले आणि जर का तुम्ही सापाला शोधलं असेल तर कमाल आहे. म्हणजे लपलेल्या वस्तू शोधण्यात तुम्ही एक्सपर्ट आहात. तुमची नजर चित्यासारखी तेज आहे. कमेंटमध्ये जाऊन उत्तर शोधण्यापेक्षा फोटो स्वतःच निरखून पाहा.

संपादन - सुस्मिता वडतिले  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Find a snake hidden in this photo in 15 seconds; Challenge on Social Media