फिनटेक कंपन्यांना भारतात प्रचंड संधी : पंतप्रधान

पीटीआय
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

""फिनटेक आणि स्टार्टअपसाठी भारत उत्तम ठिकाण आहे. भारतात फिनटेक संशोधन आणि उद्योगाने व्यापक विस्तार केला आहे. आजघडीला भारत जगातील आघाडीच्या स्टार्टअप देशांपैकी एक बनला आहे. भारत हा विविध प्रकारची आव्हाने असून ती आव्हाने त्याच पद्धतीने स्वीकारायला हवीत.'' 

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

सिंगापूर : जगभरातील फिनटेक कंपन्यांसाठी भारत संधीचे प्रवेशद्वार असून गुंतवणूकदारांसाठी भारत आता सर्वाधिक आवडते ठिकाण बनल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. अत्यंत वेगाने आणि व्यापक प्रमाणावर होत असलेल्या डिजिटल क्रांतीमुळे देशातील 1.3 अब्ज नागरिकांची आर्थिक साक्षरता आणखी सक्षम झाली असल्याचे मोदी यांनी नमूद केले. 

सिंगापूर येथे आयोजित फिनटेक फेस्टिव्हलमध्ये बोलताना पंतप्रधान म्हणाले, की आज भारत हे जगभरातील फिनटेक कंपन्यांसाठी मोठ्या संधीचे प्रवेशद्वार बनले आहे. मोदी यांनी या वेळी ऑनलाइन ग्लोबल फिनटेक मार्केटप्लेस एपीआयएक्‍स (एपीआयएक्‍स)चे त्यांनी अनावरण केले. ते म्हणाले की, फिनटेक कंपन्या आणि वित्तीय संस्थांना जोडणारे ग्लोबल प्लॅटफॉर्म (पीएआयएक्‍स)ची सुरवात आसियान आणि भारतीय बॅंका तसेच फिनटेक कंपन्यांच्या समन्वयाने होणार आहे. कालांतराने याचा जगभरात विस्तार केला जाईल. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऐतिहासिक बदल होत आहे.

डेस्कटॉपपासून क्‍लाउड सेवेपर्यंत, आयटी सेवेपासून ते इंटरनेटपर्यंत आपण बऱ्याच अंशी कमी काळात पुढे गेलो आहोत. बाजारात दररोज उलथापालथ होत असून जागतिक अर्थव्यवस्थेचे स्वरुप बदलत आहे. तंत्रज्ञानामुळे नव्या जगात स्पर्धा आणि शक्तीची संकल्पना बदलत चालली आहे. या माध्यमातून जीवनात बदल घडवून आणण्याच्या अनेक संधी आपल्याला उपलब्ध होत आहेत, असेही ते म्हणाले. कोट 

पंतप्रधान उवाच 

भीम-यूपीआयने व्यवहार सुलभ 
आमचे आव्हानं वेगळी, मार्गही वेगळे असावेत 
अंत्योदयपासून सर्वोदयला प्राधान्य 
फिनटेक फेस्टिव्हल हा विश्‍वासाचा उत्सव 
जनधन योजनेतून 330 लाख नवीन खाते 
आर्थिक साक्षरतेसाठी डिजिटल कनेक्‍टिव्हिटी गरजेची 
भारत हे संधीचे प्रवेशद्वार

Web Title: FINTECH companies have huge opportunities in India says PM Modi