आझम खानविरुद्ध गुन्हा दाखल 

आझम खानविरुद्ध गुन्हा दाखल 

लखनौ/बदुआँ (पीटीआय): दोन वर्षांपूर्वी झालेल्या एका सभेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात अनुद्‌गार काढल्याप्रकरणी माजी मंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्याविरुद्ध आज हजरतगंज कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. डॉ.आंबेडकर महासभा ट्रस्टचे सरचिटणीस अमरनाथ प्रजापति यांनी आझम खानविरुद्ध तक्रार केली होती. 

पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत, 6 सप्टेंबर 2016 रोजी गाझियाबाद येथील हज हाऊसच्या उद्‌घाटनात सामील झालेले आझम खान यांनी डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरल्याचे म्हटले आहे. दरम्यान, आझम खान यांनी आपण भाजपचे राजकीय "ऍटम गर्ल' असल्याचे म्हटले आहे. विधानसभा निवडणूक ही आपल्याच नावावर लढवली गेली होती आणि आगामी 2019 ची लोकसभा निवडणूकदेखील आपल्याच नावावर लढली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com