बदनामीबद्दल गोवा भाजपची काँग्रेसविरुद्ध पोलिसांत तक्रार

अवित बगळे
शुक्रवार, 17 मार्च 2017

पणजी - भाजपने सत्ता स्थापनेसाठी एक हजार कोटींचा घोडेबाजार केला असे भाजपची अब्रू काढणारे वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव गिरीश चोडणकर यांच्याविरोधात आज रात्री 9 वाजता पणजी पोलिसात भाजपने तक्रार केली. पोलिसांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे. चोडणकर यांच्यावर अब्रू नुकसानीचा खटलाही दाखल करण्यात येणार असून त्याची नोटीस सकाळी पाठवली जाईल, अशी माहिती तेंडुलकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. 

पणजीच्या पोलिस निरीक्षकांच्या नावे दिलेल्या लेखी तक्रारीत तेंडुलकर यांनी म्हटले आहे, की15 व 16 मार्चला माध्यमांसमोर चोडणकर यांनी चुकीचे वक्तव्य केले आहे. भाजपने घटक पक्षांचे समर्थन मिळविण्यासाठी 1 हजार कोटी रुपये खर्च केल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याही पुढे त्यांनी पर्रीकर हे जनतेचे सत्ताभ्रष्ट केले असतानाही काँग्रेसच्या आमदारांची मखलाशी करत आहेत. भाजपविरोधात लढलेले पक्ष पैशाच्या वापराशिवाय त्यांच्या बाजूने येणे शक्‍यच नाही असे म्हटल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. 

काँग्रेसचे आपले आमदार संपर्कात आहेत या पर्रीकर यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना त्यांनी (भाजपचे प्रदेश सरचिटणीस) सदानंद शेट तानावडे याचे कॉल व मेसेजच्या नोंदी सार्वजनिक कराव्यात असे आव्हान देत भाजप स्थैर्यासाठी काँग्रेस आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे नमूद केले होते. या तक्रारीसोबत वर्तमानपत्रांची कात्रणेही त्यांनी जोडली आहेत. 

चोडणकर यांचे हे वक्तव्य हेतूतः भाजपची बदनामी करण्यासाठीच केले गेले आहे. भाजप हा देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. देशाच्या संसदेत आणि राज्यांच्या विधानसभांत पक्षाचे मोठे प्रतिनिधीत्व आहे. केंद्रात आणि 13 राज्यांत भाजपची सत्ता आहे. याचा अर्थ जनतेचा विश्‍वास भाजपवर आहे. चोडणकर यांचे विधान सर्वत्र पसरल्याने लोकांत संभ्रम निर्माण होऊ शकतो. चोडणकर यांनी बेजाबदारपणे हे वक्तव्य करत पक्षाची प्रतीमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा अशी मागणीही या तक्रारीत करण्यात आली आहे. 

भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या 500 व 501 कलमांतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे.

Web Title: FIR against BJP, Congress in Goa about the defamation