शमनेवाडी येथे एटीएमला आग; 34 लाख जळाल्याचा संशय

शमनेवाडी येथे एटीएमला आग; 34 लाख जळाल्याचा संशय

बेडकिहाळ : शमनेवाडी (ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) येथील बस स्थानक परिसरात असलेल्या एसबीआय बॅंकेच्या एटीएम सेंटरला मंगळवारी दुपारी 12.30 च्या सुमारास अचानक आग लागली. त्यात 34 लाख जळाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तसेच लाखो रुपयांचे साहित्यही खाक झाले आहे. 

शमनेवाडी येथील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये 36 लाख रुपये जमा केले होते. अक्षयतृतीया असल्याने रक्कम काढण्यासाठी ग्राहकांची वर्दळ होती. सकाळी 11 च्या दरम्यान एक ग्राहक एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेला होता, पण आत काहीतरी जळत असल्याचा वास आला. तो तेथून पैसे काढून निघून गेला. त्यानंतर अचानक आतून धूर येत असल्याचे जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयात बसलेल्या ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना दिसून आले. गावकऱ्यांनी पाण्याचा मारा करून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. पण आगीने भयंकर रुद्र रूप धारण केल्याने दोन एअर कूलरचा स्फोट झाला. त्यानंतर सदलगा येथील अग्निशामक दलाला पाचारण करून आग विझविण्याचा प्रयत्न झाला. पण तोपर्यंत सर्वकाही जळाले होते.

एसबीआयचे शाखा व्यवस्थापक आमोद कुमार म्हणाले, ""बॅंकेच्या एटीएम मशिनमध्ये सोमवारी 20 लाख रुपये जमा केले होते. त्याअगोदर एटीएममध्ये 16 लाख रुपये होते. अशी एकूण 36 लाखांची रक्कम एटीएममध्ये होती.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com