पिण्याच्या पाण्यावरून सासू-सासऱ्यांनी जाळले सुनेला

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 जुलै 2019

देशातील विविध भागांमध्ये पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला असून, नागरिकांना बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.

भोपाळ : देशातील विविध भागांमध्ये पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला असून, नागरिकांना बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. पाण्यावरून सासू-सासऱयांनी सुनेला जिवंत जाळल्याची घटना मध्य प्रदेशात घडली आहे.

मध्य प्रदेशातील विविध भागांमध्ये दुष्काळामुळे पाण्याची गंभीर समस्या आहे. गावातील नागरिकांना पाण्यासाठी विविध ठिकाणी फिरावे लागत आहे. बडेरा येथील एका कुटुंबामध्ये पाण्यावरून भांडण झाले आणि सासू-सासारय़ांनी सुनेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत सून 90 टक्के भाजली असून, उपचारासाठी त्यांना भोपाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बडेरा येथील साहू कुटुंबात गेल्या अनेक दिवसांपासून जमिनीच्या वाटणीवरून भांडण सुरू आहे. कुटुंबातील राजेश यांच्या वाट्याला आलेल्या जमिनीत पाण्याची टाकी आहे. तर कुटुंबीयांच्या वाट्याला आलेल्या जमिनीत हापसा आहे. या हापस्यावर पाणी भरण्यासाठी कुटुंबातील सदस्य आल्यानंतर येथे भांडण होत होती. कुटुंबातील सदस्यांनी राजेश आणि त्याची पत्नी द्वारकाला या हापशावरुन पाणी भरण्यास मनाई केली होती. पाण्यावरून कुटुंबियांमध्ये भांडण होत होते. कुटुंबातील सदस्यांबरोबर द्वारकाचे भांडण झाले. त्यावेळी सासू-सासऱयांनी द्वारकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. द्वारकाच्या किंकाळ्यांचा आवाज ऐकून पती राजेश आणि तिच्या मुलीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, द्वारकाला लपेटलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. द्वारकाला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. या घटनेत द्वारका 90 टक्के भाजली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सासू-सासरे, दीर-भावजय आणि चुलत सासऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A fire broke out in the house for drinking water in bhopal