गोवा : धावत्या वाहनाने घेतला अचानक पेट 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

दक्षिण गोव्यातील झुआरी पुलाजवळ एका वाहनाने अचानक पेट घेतला. या दुर्घटनेत वाहन चालकांना प्रसंगवधान ओळखून वाहन रस्त्याच्या बाजूला थांबवून तो बाहेर आल्याने बचावला. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली.

गोवा : दक्षिण गोव्यातील झुआरी पुलाजवळ एका वाहनाने अचानक पेट घेतला. या दुर्घटनेत वाहन चालकांना प्रसंगवधान ओळखून वाहन रस्त्याच्या बाजूला थांबवून तो बाहेर आल्याने बचावला. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली.

कुठ्ठाळ्ळी येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते व त्यातच भररस्त्यावर वाहनाने पेट घेतल्याने वाहतुकीत खोळंबा झाला. अग्निशमन दलाची गाडीही या कोंडीत अडकली. वाहनाला आग लागलेल्या ठिकाणी ही गाडी पोहचेपर्यंत उशीर झाला तोपर्यंत पेट घेतलेले वाहन आगीत पूर्ण जळाले. या दुर्घटनेत कोणी जखमी झाले नाही.

Web Title: fire at driving car in goa

टॅग्स