भंगाराच्या गोदामाला लागलेल्या आगीत एक ठार

वृत्तसंस्था
रविवार, 30 एप्रिल 2017

राजधानी दिल्लीतील मालवीय नगर येथील जवळपास तीस गोदामांना आज (रविवार) लागलेल्या भीषण आगीत एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील मालवीय नगर येथील जवळपास तीस गोदामांना आज (रविवार) लागलेल्या भीषण आगीत एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.

दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर येथील भंगाराच्या बाजारात आज पहाटे मोठी आग लागली. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. जवळपास तीस दुकानांमध्ये ही आग पसरली. या आगीमध्ये एक जणाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे तीस बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. या आगीमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: fire in malviya nagar scrap market one killed