ग्वाल्हेरजवळ रेल्वेला आग; प्रवाशी सुखरूप

पीटीआय
मंगळवार, 22 मे 2018

नवी दिल्ली-विशाखापट्टणम्‌ एपी एक्‍सप्रेस रेल्वेच्या दोन डब्यांना आज ग्वाल्हेर जिल्ह्यातील बिर्लानगर स्थानकाजवळ आग लागली. यामध्ये कोणीही जखमी किंवा मृत झाल्याचे वृत्त नसल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. ही आग नंतर विझविण्यात आली. 
 

ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) - नवी दिल्ली-विशाखापट्टणम्‌ एपी एक्‍सप्रेस रेल्वेच्या दोन डब्यांना आज ग्वाल्हेर जिल्ह्यातील बिर्लानगर स्थानकाजवळ आग लागली. यामध्ये कोणीही जखमी किंवा मृत झाल्याचे वृत्त नसल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. ही आग नंतर विझविण्यात आली. 

पूर्ण वातानुकूलित असलेल्या रेल्वे क्रमांक 22416च्या बी-6 आणि बी-7 या डब्यांना सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास आग लागली, अशी माहिती उत्तर मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी गौरव कृष्णा बन्सल यांनी दिली. 

येथून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या बिर्लानगर स्थानकाजवळ रेल्वेला आग लागल्यानंतर काही प्रवाशांनी साखळी ओढून ती थांबवली आणि तातडीने रेल्वेतून उतरले, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. ही आग विझवण्यात आली आणि रेल्वे तिच्या पुढील मार्गाने निघून गेली. आगीमध्ये दोन वातानुकूलित डब्यांचे नुकसान झाल्याची माहिती घटनास्थळी असलेले जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नवनीत भसीन यांनी दिली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. 

Web Title: Fire on railway near Gwalior; Traveler safely