रिलायन्सच्या रबर प्लॅन्टला आग; तीन कामगारांचा मृत्यू !

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

बडोदा: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या गुजरातमधील रबर कारखान्यात लागलेल्या आगीत तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. रबर कारखान्यातील एका विभागात लागलेल्या आगीत ही दुर्घटना घडली आहे. आज सकाळीच ही आघ लागली आहे. बडोद्यातील हा कारखाना 'पॉलीब्युटाडाईन रबर'ची (पीबीआर 2) निर्मिती करतो. 'बडोद्यातील या पीबीआर 2 कारखान्यात आज सकाळी ही आग लागली. ही दुर्घटना दुर्दैवी आहे. आगीला एका विभागात रोखण्यात आले आणि कंपनीच्या अग्निशमन दलाने ती आटोक्यात आणण्यासाठी तत्परता दाखवली. मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबांबद्दल आम्हाला सहानुभूती वाटते.

बडोदा: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या गुजरातमधील रबर कारखान्यात लागलेल्या आगीत तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. रबर कारखान्यातील एका विभागात लागलेल्या आगीत ही दुर्घटना घडली आहे. आज सकाळीच ही आघ लागली आहे. बडोद्यातील हा कारखाना 'पॉलीब्युटाडाईन रबर'ची (पीबीआर 2) निर्मिती करतो. 'बडोद्यातील या पीबीआर 2 कारखान्यात आज सकाळी ही आग लागली. ही दुर्घटना दुर्दैवी आहे. आगीला एका विभागात रोखण्यात आले आणि कंपनीच्या अग्निशमन दलाने ती आटोक्यात आणण्यासाठी तत्परता दाखवली. मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबांबद्दल आम्हाला सहानुभूती वाटते. या दुर्दैवी घटनेतून बाहेर पडण्यासाठी आम्ही या कामगारांच्या कुटुंबियांना मदत करू', असे वक्तव्य रिलायन्सच्या वतीन देण्यात आले आहे. 

आगीत मृत्यूमुखी पडलेले तिन्ही कामगार कंत्राटी कामगार होते. आगीत ते गंभीररित्या भाजले गेले. त्यानंतर औषधोपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कंपनीच्या वतीने या प्रकरणाचा तपास केला जाणार असून आग लागण्यामागचे कारण शोधले जाणार आहे. आग आटोक्यात आणल्यानंतर कारखान्यातील दैनंदिन कामकाज सुरु करण्यात आले आहे.

Web Title: Fire at Reliance rubber plant in Vadodara, three dead