अरुणाचल प्रदेशात गोळीबार; आमदारसह 11 जण ठार

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 मे 2019

- अज्ञातांनी केला गोळीबार.

- आमदार, त्यांचा मुलगा यांच्यासह 11 जण ठार.

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील बोगापणी भागात अज्ञातांनी गोळीबार केला. यामध्ये नॅशनल पीपल्स पक्षाचे (एनपीपी) विद्यमान आमदार तिरोंग अबोह आणि त्यांच्या मुलासह 11 जण ठार झाले. हा गोळीबार तिराप जिल्ह्यातील बोगापणी भागात घडला.

तिरोंग हे खोंसा पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करत होते. हा गोळीबार नेमका कोणत्या कारणामुळे झाला याबाबतची माहिती मिळू शकली नाही. मात्र, नॅशनल सोशिआलिस्ट काऊंसिल ऑफ नागालँडच्या (एनएससीएन) दहशतवाद्यांकडून हा हल्ला घडविण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.  

दरम्यान, मेघालयचे मुख्यमंत्री कोन्राड संगमा यांनी ट्विटरवरून सांगितले, की या गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर एनपीपीला मोठा धक्का बसला. या गोळीबारात आमदार अबोह यांचा मृत्यू झाला. मी अबोह यांच्या कुटुंबियांचे सांत्त्वन करतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Firing in Arunachal Pradesh NPP MLA Tirong Aboh son among 11 shot dead