भारत-पाक सीमेवर गोळीबार; पाक सैनिक ठार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

श्रीनगर- भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर गुरुवारी (ता. 20) रात्रीपासून सुरू झालेल्या गोळीबारात पाकिस्तानचा एक सैनिक ठार झाला असून, सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान जखमी झाला आहे.

भारत-पाक सीमेवर असलेल्या हिरानगर सेक्टरमधील बोबिया नाक्याजवळ पाकिस्तानकडून गोळीबार सुरू करण्यात आला. तब्बल 15 तासांपासून सुरू असलेल्या या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये पाकिस्तानचा एक सैनिक ठार झाला तर बीएसएफचा एक जवान जखमी झाला आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास हा गोळीबार थांबला.

Web Title: firing on india-pakistan border, pak troops killed