जैवइंधनावर विमानभरारी 

यूएनआय
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली (यूएनआय) : स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेला प्राधान्य देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवत जैवइंधनावर विमान उडविण्याची महत्त्वाची कामगिरी आज भारताच्या नावावर जमा झाली. जैवइंधनाचा वापर करत एका खासगी कंपनीच्या विमानाने डेहराडून ते दिल्ली अशी यशस्वी भरारी घेतली. त्यामुळे जैवइंधनाचा हवाई क्षेत्रात वापर करण्यात यशस्वी ठरलेल्या जगभरातील मोजक्‍याच देशांच्या पक्तींत आता भारताचा समावेश झाला आहे. 

डेहराडून ते दिल्ली उड्डाण 
डेहराडूनच्या विमानतळावरून स्पाईस जेट या खासगी कंपनीच्या विमानाने 23 प्रवासी आणि पाच कर्मचाऱ्यांना घेऊन दिल्लीच्या दिशेने उड्डाण केले. या विमानाच्या एका इंजिनामध्ये जैवइंधनाचा वापर करण्यात आला होता. डेहराडून स्थित इंडियन इंस्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम या संस्थेने विमानात वापरण्यात आलेल्या जैवइंधनाची निर्मिती केली होती. 

ये तो सिर्फ ट्रेलर है : प्रभू 
डेहराडूनहून उड्डाण केलेले संबंधित विमान दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू म्हणाले, की ही तर फक्त सुरवात आहे. पुढील काळात विमानासाठीच्या जैव इंधनाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याची आवश्‍यकता आहे. विमानासाठी वापरले जाणारे इंधन (एटीएफ) 75 टक्के आणि जैव इंधन 25 टक्के वापरून स्पाइस जेटच्या विमानाने यशस्वी उड्डाण केले. 

पर्यावरण स्नेही इंधन 
- 25 टक्के जैवइंधनाच्या वापरामुळे कार्बन उत्सर्जन 15 टक्‍क्‍यांनी कमी होऊ शकते 
- 100 टक्के जैव इंधन वापरल्यास कार्बन उत्सर्जन 60 ते 70 टक्‍क्‍यांनी कमी केले जाऊ शकते 
- क्रूड तेलावरील अवलंबन कमी करण्यासाठी आजचा प्रयोग लाभदायक ठरू शकतो 
- भारतातील विमानासाठीच्या इंधनाचे (एटीएफ) दर जगात सर्वाधिक आहेत 
- विमानासाठीच्या इंधनावर मोठ्या प्रमाणात सरकारी कर आणि उपकर लावण्यात येतात 
- जैवइंधनाचा वापर वाढला तर इंधनाच्या आयातीत घट होऊ शकते 

विमानांच्या उड्डाणांसाठी जैवइंधनाचा यशस्वी प्रयोग केलेले देश 
- अमेरिका 
- कॅनडा 
- ब्राझील 
- चिली 
- मेक्‍सिको 
- जर्मनी 
- फ्रान्स 
- ब्रिटन 
- स्पेन 
- फिनलॅंड 
- नेदरलॅंड्‌स 
- कतार 
- यूएई 
- दक्षिण आफ्रिका 
- चीन 
- जपान 
- सिंगापूर 
- थायलंड 
- इंडोनेशिया 

Web Title: first bio fuel flight