चंद्रावरून अशी दिसते पृथ्वी! "चांद्रयान-2'चे पहिले "क्‍लिक' 

पीटीआय
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

"चांद्रयान-2'ने 22 जुलैला जीएसएलव्ही मार्क-3 या प्रक्षेपकाद्वारे अवकाशात उड्डाण केले होते. "चांद्रयान-2'वरील एल-14 या कॅमेराद्वारे पृथ्वीची छायाचित्रे घेण्यात आली आहेत.

नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांची स्वप्ने घेऊन चंद्राकडे झेपावलेल्या "चांद्रयान-2'वरून पृथ्वीची काढलेली छायाचित्रे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) आज प्रसिद्ध केली.

 

 

"चांद्रयान-2'ने 22 जुलैला जीएसएलव्ही मार्क-3 या प्रक्षेपकाद्वारे अवकाशात उड्डाण केले होते. "चांद्रयान-2'वरील एल-14 या कॅमेराद्वारे पृथ्वीची छायाचित्रे घेण्यात आली आहेत. "चांद्रयान-2'च्या माध्यमातून चंद्राच्या अद्याप अज्ञात असलेल्या दक्षिण ध्रुवाची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First clicks of moon by Chandrayaan 2 shared by ISRO