नौदलाच्या इतिहासात पहिली महिला वैमानिक तुकडी

पीटीआय
Friday, 23 October 2020

सागरी मोहिमा फत्ते करण्यासाठी नौदलाच्या तीन महिला वैमानिकांची पहिली बॅच सज्ज झाली आहे. लेप्टनंट दिव्या शर्मा, लेप्टनंट शुभांगी स्वरुप आणि लेप्टनंट शिवांगी असे वैमानिकांचे नाव आहेत.

कोची - सागरी मोहिमा फत्ते करण्यासाठी नौदलाच्या तीन महिला वैमानिकांची पहिली बॅच सज्ज झाली आहे. लेप्टनंट दिव्या शर्मा, लेप्टनंट शुभांगी स्वरुप आणि लेप्टनंट शिवांगी असे वैमानिकांचे नाव आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय नौदलाच्या इतिहासात प्रथमच तीन महिला वैमानिकांची पहिली बॅच तयार झाली आहे. या वैमानिक डॉर्निअर विमानातून सागरी मोहिमा पार पाडण्यासाठी पात्र ठरल्या आहेत.  तीन महिला वैमानिकांनी २७ व्या डॉर्निअर ऑपरेशनल फ्लाइंग ट्रेनिंग (डीओएफटी) च्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता. यात अन्य तीन वैमानिकांचा देखील सहभाग होता. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आज त्यांनी आयएनएस गरुड येथे पासिंग आउट परेडमध्ये एमआर पायलट पदवी प्राप्त केली. या वेळी दक्षिण नौदल कमांडचे चिफ स्टाफ ऑफिसर (प्रशिक्षण) रिअर ॲडमिरल ॲन्टोंनी जॉर्ज यांची प्रमुख उपस्थिती होती आणि त्यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तिन्ही महिला उत्तर भारतातील
तीन वैमानिकांपैकी दिव्या शर्मा नवी दिल्लीच्या मालवीय नगरच्या आहेत तर लेप्टनंट शुभांगी स्वरुप या उत्तर प्रदेशच्या तिलहर येथून आहेत. तसेच लेप्टनंट शिवांगी या बिहारच्या मुझफ्फरपूर येथील राहणाऱ्या आहेत. त्यांनी ही पदवी प्राप्त करण्यापूर्वी हवाईदल आणि नौदलासमवेत उड्डाणाचे प्रशिक्षण घेतले होते. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The first female pilot unit in the history of the Navy