राष्ट्रपतींनी फेटाळला पहिलाच दयेचा अर्ज 

वृत्तसंस्था
बुधवार, 30 मे 2018

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पदभार स्विकारल्यानंतर त्यांच्याकडे दयेसाठीचा पहिलाच अर्ज आला होता. या अर्जावर निर्णय घेताना त्यांनी तो फेटाळून लावत न्यायालयाने दिलेली शिक्षा कामय ठेवण्याचा निर्णय घेतला. 2006 साली बिहारमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांना झोपेत असतानाच जाळून ठार मारणाऱ्या आले होते. यातील मुख्य आरोपी जगत राय याला सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. राय याने फाशीची शिक्षा रद्द व्हावी यासाठी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. यातील विशेष बाब म्हणजे ही घटना ज्यावेळी बिहार मधील वैशाली जिल्ह्यात घडली तेव्हा रामनाथ कोविंद हे बिहार राज्याचे राज्यपाल होते. 

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पदभार स्विकारल्यानंतर त्यांच्याकडे दयेसाठीचा पहिलाच अर्ज आला होता. या अर्जावर निर्णय घेताना त्यांनी तो फेटाळून लावत न्यायालयाने दिलेली शिक्षा कामय ठेवण्याचा निर्णय घेतला. 2006 साली बिहारमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांना झोपेत असतानाच जाळून ठार मारणाऱ्या आले होते. यातील मुख्य आरोपी जगत राय याला सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. राय याने फाशीची शिक्षा रद्द व्हावी यासाठी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. यातील विशेष बाब म्हणजे ही घटना ज्यावेळी बिहार मधील वैशाली जिल्ह्यात घडली तेव्हा रामनाथ कोविंद हे बिहार राज्याचे राज्यपाल होते. 

बिहारमध्ये 2006 साली विजेंद्र महोता यांच्या कुटुंबातील 6 जणांचा राय याने खून केला होता. म्हैस चोरीच्या आरोपावरून जगत राय, वझीर राय आणि अजय राय यांच्या विरोधात महोता यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. ही तक्रार मागे घण्यासाठी राय यांच्याकडून महोता यांच्यावर दबाव टाकण्यात येत होता. महोता तक्रार मागे घेत नसल्याचे लक्षात आल्यावर राय यांनी रात्रीच्या वेळी सर्वजन झोपले असताना महोता यांचे घर पेटवून दिले. यामध्ये महोता यांच्या पत्नीसही पाच मुलांचाही जिव गेला होता. या प्रकरणात पाच वर्षापुर्वी सर्वोच्च न्यायालयाने जगत राय याला फाशीची सिक्षा सुनावली होती. ही फाशीची शिक्षा रद्द व्हावी यासाठीचा दयेचा अर्ज कोविंद यांच्याकडे करण्यात आला होता. कोविंद यांनी तो फेटाळला.

 

Web Title: first mercy petition rejected by the president