भारतातील मोबाईल पंचविशीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

मोबाईलशिवाय आयुष्य ही कल्पनाच आता करवत नाही. भारतात ३१ जुलै १९९५ रोजी पहिला मोबाईल कॉल करण्यात आला. त्याला काल २४ वर्षे पूर्ण झाली आहेत.

मोबाईलशिवाय आयुष्य ही कल्पनाच आता करवत नाही. भारतात ३१ जुलै १९९५ रोजी पहिला मोबाईल कॉल करण्यात आला. त्याला काल २४ वर्षे पूर्ण झाली आहेत. सार्वजनिक दूरध्वनी केंद्रापुढे पूर्वी फोन करण्यासाठी रांग लागत असे. पण मोबाईलच्या रूपाने फोन खिशात येऊन बसला आणि देशात मोबाईल क्रांतीला सुरवात झाली. भारत आता देशातील दुसरी दूरसंचार बाजारपेठ बनला आहे. मोबाईल फोन वापरणाऱ्यांचा संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. पश्‍चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योति बसू यांनी ३१ जुलै १९९५ रोजी पहिला मोबाईल कॉल केला. तत्कालीन केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम यांच्याशी त्यांनी मोबाईल फोनवरून चर्चा केली होती.

पहिला कॉल...
कोलकाता ते दिल्ली या दरम्यान केला गेला
ज्योती बसू यांनी हा कॉल कोलकातामधील रॉयटर्स इमारतीतून दिल्लीतील संचार भवन येथे केला होता.
‘मोदी टेल्स्ट्रा’ ही भारतातील पहिली मोबाईल ऑपरेटर कंपनी होती
‘मोदी टेल्स्ट्रा’ ही कंपनी भारतातील मोदी ग्रुप आणि ऑस्ट्रेलियातील दूरसंचार कंपनी ‘टेल्स्ट्रा’चा भागीदारीतील उपक्रम होता 
या कंपनीच्या सेवेला ‘मोबाईल नेट’ या नाव्याने ओळखले जात होते
पहिला कॉल याच सेवेद्वारे केला गेला

शुल्क व इंटरनेट सेवा
सुरवातीला फोन करण्यासाठी १६ रुपये ४० पैसे प्रति मिनीट असे शुल्क.
इनकमिंग कॉललाही पैसे पडत होते. त्यासाठी ८ रुपये ४० पैसे असा दर होता.
पहिल्या पाच वर्षांपर्यंत देशातील मोबाईलधारकांची संख्या ५० लाखांपर्यंत पोचली.
‘विदेश संचार निगम लिमिटेड’ने १९९५मध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीयांना इंटरनेट सेवेची भेट दिली.
‘व्हीएसएनएल’ने देशात गेटवे इंटरनेट ॲक्‍सेस सर्व्हिस सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला.
सुरवातीला इंटरनेट सेवा चार महानगरांपर्यंतच मर्यादित होती. 
इंटरनेटसाठी त्या वेळी २५० तासांसाठी पाच हजार रुपये शुल्क होते.
खासगी कंपन्यांसाठी हा दर १५ हजार रुपये होता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The first mobile call was in India on 31 July 1979