आधी तुमचा देश सांभाळा; नसीरुद्दीन यांनी पाकला सुनावले

वृत्तसंस्था
रविवार, 23 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी समाजात मोठ्या प्रमाणावर विष पसरले आहे. त्यामुळे माझ्या मुलांना भारतात ठेवायला भीती वाटत आहे, असे विधान काही दिवसांपूर्वी केले होते. त्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शहा यांच्या वक्तव्याला मोहम्मद अली जिना यांच्या वक्तव्याशी जोडले. मात्र, इम्रान खानच्या या वक्तव्यावरून नसीरुद्दीन शहांनीच त्यांना चांगलेच सुनावले.

उत्तरप्रदेशातील बुलंदशहर येथे गोहत्येच्या अफवेवरुन काही दिवसांपूर्वी हिंसाचार झाला होता. या मुद्यावरून नसीरूद्दीन शहा यांनी केलेल्या वक्तव्यावरुन मोठा वादंग निर्माण झाला होता. त्यावर इमरान खान यांनी भाष्य केले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अल्पसंख्यकांबरोबर वागायचे कसे हे शिकवू, असे ते म्हणाले होते. मात्र, त्यावर आता नसीरुद्दीन यांनी इम्रान खान यांना चांगलेच फैलावर घेतले.

शहा यांनी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले, की जे त्यांच्या देशाशी संबंधित आहे. त्याच मुद्यावर इम्रान खान यांनी भाष्य केले पाहिजे. ज्या गोष्टींशी त्यांचा काहीही संबंध नाही. त्यावर त्यांनी बोलू नये, असे मला वाटते. तसेच ते पुढे म्हणाले, गेल्या 70 वर्षांपासून आमच्याकडे लोकशाही आहे. त्यामुळे आमची काळजी कशी घ्यावी, हे आम्हाला समजते.

Web Title: First protect your country Naseeruddin said to PAK PM Imran Khan