Viral Video: पहिलीच्या विद्यार्थिनीला चक्क खोलीत बंद करुन शिक्षक अन् शिपाई घरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

viral video

Viral Video: पहिलीच्या विद्यार्थिनीला चक्क खोलीत बंद करुन शिक्षक अन् शिपाई घरी

सोशल मीडियावर अनेक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय. एका शाळेतील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थिनीला चक्क खोलीत बंद करून घरी गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

हेही वाचा: Viral Video: अरे हालो! गरब्याच्या तालावर तिच्याबरोबर कुत्राही थिरकला, बघा भन्नाट व्हिडिओ

उत्तर प्रदेशच्या बुलंदरशहर जिल्ह्यातील येथील हा धक्कादायक प्रकार आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शाळेतील मुख्याध्यापक, चार शिक्षकांना निलंबित केले. या व्हिडिओत तुम्हाला पहिल्या वर्गातील विद्यार्थीनी खोलीत कोंडलेली दिसेल.

शिक्षकांचा आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणा हे प्रकरण घडल्याचे तपासात समोर आले. सुट्टीनंतर सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी वर्गाची पाहणी करायची असते, मात्र यात त्यांनी हलगर्जीपणा दाखवल्याने मुलगी खोलीत कोंडली गेली.

हेही वाचा: Viral Video: बुमराहला दुखापत झाल्यानंतर सोशल मीडियावर बॉबी देवल का होतोय ट्रेंड?

पहिल्या वर्गाची विद्यार्थीनी सुमारे दोन तास वर्गखोलीत बंद होती. विद्यार्थीनी घरी पोहचली नाही म्हणून कुटूंब शाळेत पोहचले पण त्यांना त्यांची मुलगी वर्गात बंद दिसली त्यानंतर हे सर्व प्रकरण उघडकीस आले.

सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी या घटनेवर संताप व्यक्त करत आहे.

टॅग्स :viralVideoviral video