देशात पहिल्यांदाच एका राज्यात पाच उपमुख्यमंत्री; शनिवारी शपथविधी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 जून 2019

आंध्र प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी सरकारमध्ये पाच उपमुख्यमंत्री ठेवण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतला आहे. देशात पहिल्यांदाच एखाद्या राज्याच्या मंत्रिमंडळात पाच उपमुख्यमंत्री असतील.

हैदराबाद : आंध्र प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी सरकारमध्ये पाच उपमुख्यमंत्री ठेवण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतला आहे. देशात पहिल्यांदाच एखाद्या राज्याच्या मंत्रिमंडळात पाच उपमुख्यमंत्री असतील.

मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत सर्व नवनिर्वाचित आमदार उपस्थित होते. यावेळी त्यांनी सामान्यांच्या अपेक्षा लक्षात घेऊन नवीन मंत्र्यांची नियुक्ती करत असल्याचे सांगितले. शनिवारी 25 जणांना मंत्रिपदाची शपथ दिली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी दिली आहे.

पाच उपमुख्यमंत्री असे असतील 

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय जाती, अल्पसंख्याक आणि कापू समाजातील असतील. जगनमोहन रेड्डी यांनी शुक्रवारी झालेल्या विधिमंडळाच्या बैठकीत ही घोषणा केली.  यापूर्वी चंद्राबाबू नायडू यांच्या कार्यकाळात दोन उपमुख्यमंत्री होते. यामधील एक मागासवर्गीय जाती आणि दुसरे कापू समाजातील होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first time in country five deputy chief minister in one state