पहिल्या महिला आयएएस ऍना मल्होत्रा यांचे निधन

पीटीआय
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

मुंबई : स्वतंत्र भारतातील पहिल्या महिला आयएएस अधिकारी ऍना राजम मल्होत्रा (वय 91) यांचे काल (ता. 17) येथे वृद्धापकाळाने निधन झाले. मुंबईजवळील "जेएनपीटी' बंदर विकासात त्यांची मोठी भूमिका होती. 

ऍना यांचा जन्म केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यात 1927 ला झाला होता. कोझीकोडे येथे शालेय शिक्षण झाल्यावर त्या पुढील शिक्षणासाठी चेन्नईला आल्या. 1951 ला त्या नागरी सेवेत दाखल झाल्या. मद्रास केडर निवडून त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री सी. राजगोपालचारी यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनात कामाला सुरवात केली. त्यांनी नंतर आर. एन. मल्होत्रा यांच्याशी विवाह केला.

आर. एन. मल्होत्रा नंतर 1985 ते 1990 या काळात भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर होते. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) उभारणीवेळी त्या या ट्रस्टच्या अध्यक्षा होत्या. त्यांनी सेवेत असताना केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून 1989 मध्ये त्यांना पद्मभूषण किताब देऊन सरकारने गौरविले होते. 

ऍना मल्होत्रा यांनी तमिळनाडूच्या सात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम केले. आशियाई खेळांचे नियोजन त्यांच्याकडे होते. त्या वेळी त्यांनी राजीव गांधी यांच्याबरोबरही काम केले. निवृत्तीनंतर त्या हॉटेल लीला व्हेंचरच्या संचालक म्हणून काम पाहत होत्या. 
 
Web Title: First woman IAS Ana Malhotra dies