२३ दिवसांची मुलगी गरोदर ? मुलीच्या पोटातून काढले ८ भ्रूण; तज्ज्ञ काय म्हणतात ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fits in fitu

२३ दिवसांची मुलगी गरोदर ? मुलीच्या पोटातून काढले ८ भ्रूण; तज्ज्ञ काय म्हणतात ?

मुंबई : झारखंडच्या रामगढमध्ये राहणाऱ्या एका महिलेने 10 ऑक्टोबरला एका मुलीला जन्म दिला. पण जन्मानंतर मुलीच्या पोटात दुखू लागलं. रामगढ रुग्णालयात तिचं सीटी स्कॅन केलं तेव्हा तिच्या पोटात ट्युमर असल्याचं डॉक्टरांना वाटलं. त्यानंतर तिला तात्काळ रांचीतल्या राणी बाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  तिथं डॉक्टरांना धक्काच बसला.

हेही वाचा: Pregnancy : गरोदर असल्याचे कळल्यानंतर अवघ्या ४८ तासांत महिलेने दिला बाळाला जन्म

डॉक्टरांनी तिच्या तपासण्या केल्या तेव्हा तिच्या पोटात ट्युमर नव्हे तर भ्रूण असल्याचं दिसलं. तब्बल ८ भ्रूण तिच्या पोटात होते. डॉक्टरांनी ऑपरेशन करून मुलीच्या पोटातील अविकसित भ्रूण काढले आहेत.

या मुलीचं ऑपरेशन करणारे डॉ. इम्रान यांनी सांगितलं की, जगातील ५ ते १० लाख मुलांमध्ये एक असं प्रकरण होतं. आतापर्यंत जगात 200 अशी प्रकरणं आहेत. भारतातील हे पहिलं प्रकरण आहे. कारण याआधी लहान मुलांच्या पोटातून एक किंवा दोन भ्रूण काढण्यात आले आहेत. पण ८ भ्रूण हे धक्कादायक आहे.

हेही वाचा: Pregnancy : प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी काय कराल ?

नवजात बाळांच्या पोटात भ्रूण असण्याच्या घटना दुर्मिळ आहेत. पण एकाच बाळाच्या पोटातून इतक्या प्रमाणत भ्रूण निघणं हे देशातीलच नव्हे तर जगातील असं पहिलंच प्रकरण असल्याचं सांगितलं जातं आहे. मुलीला एका आठवड्यानंतर रुग्णालायातून डिस्चार्ज देण्यात येईल.

रांची स्थित राणी चिल्ड्रेन रुग्णालयाचे प्रमुख राजेश सिंहचे म्हणणे आहे की, 'सदर प्रकरण विचित्र असल्यामुळे हा प्रकार एका आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित करण्याची तयारी सुरू आहे.

'जर्नल ऑफ नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिन'च्या नुसार या स्थितीला 'फीट्स इन फेटू' म्हटलं जाते. डॉ. इमरानच्या म्हणण्यानुसार 'एफआईएफ'च्या प्रकरणामध्ये आठ भ्रूण आढळण्याचे एकही प्रकरण समोर आलेलं नाही. हे विचित्र प्रकरण १० लाख मुलांमधून एका मुलाला होतो.

टॅग्स :pregnancychildren