जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात दोन जवान शहीद; 3 जखमी

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 5 October 2020

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे.

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. आरओपीवर road opening party (ROP) दहशतवाद्यांकडून अंदाधूंद गोळीबार करण्यात आला यात सीआरपीएफच्या दोन जवानांचा मृत्यू झाला आहे, तर चीन जवान जखमी झाले आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. एएनआयने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. दक्षिण काश्मीरच्या पेंम्पोरमध्ये हा हल्ला झाला असून लष्करांने परिसरात शोध मोहीम सुरु केली आहे. 

 

 

दहशतवाद्यांनी नौगाममध्ये केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे (सीआरपीफ) दोन जवान आज हुतात्मा झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नौगाम जिल्ह्यातील कांदीझल पुलाजवळ दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या ताफ्यावर हल्ला केला. या गोळीबारात एका अधिकाऱ्यासह काही जवान जखमी झाले. त्यांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारांपूर्वीच दोघांचे निधन झाले. कॉन्स्टेबल शालिंदर प्रतापसिंह आणि कॉन्स्टेबल देवेंद्रकुमार त्रिपाठी अशी हुतात्मा जवानांची नावे आहेत. तर एएसआय गोरखनाथ, कॉन्स्टेबल किरगेन, आणि कॉन्स्टेबल जेम्स हे जखमी झाले आहेत. यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संपूर्ण परिसरात दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले असून, घटनेचा तपासही सुरू केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five CRPF jawans injured after terrorists fired upon road