बेळगावात ट्रक मोटार अपघातात पाच ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जून 2019

एक नजर

  • ट्रक आणि मोटारीला झालेल्या भीषण अपघात पाच जण ठार
  • रविवारी (ता.2) श्रीनगरनजीक हा अपघात
  • अन्य एकजण गंभीर जखमी 

बेळगाव - येथे पुणे बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि मोटारीला झालेल्या भीषण अपघात पाच जण ठार झाले. रविवारी (ता.2) श्रीनगरनजीक हा अपघात घडला. अन्य एकजण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. 

अपघातात मृत्यू पावलेल्याची अद्याप ओळख पटली नसून त्यांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व मृतदेह जिल्हा रुग्णालयातील शवागृहात हलविण्यात आले आहेत. घटनास्थळी उत्तर वाहतूक पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: five dead in an accident in Belgaum