बंगालमध्ये पंचायत निवडणुकीत हिंसाचार; पाच जण ठार 

पीटीआय
मंगळवार, 15 मे 2018

घटनाक्रम 
मुर्शिदाबाद जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्याची गोळी झाडून हत्या 
दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यात तपन येथे एक ठार, चार जखमी 
अमदंगा येथील मतदान केंद्राबाहेर स्फोटात सीपीआय (एम) समर्थक ठार; अन्य जखमी 
नादियात हिंसाचार एक ठार, दोन जखमी 
कुचबिहार जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर मंत्र्याकडून एका व्यक्तीस मारहाण 
लोहमार्गावर तीन जिवंत बॉंब हस्तगत 
बसंती गट निवडणुकीत बुरखाधारी बंदूकधाऱ्यांचा वावर 
भानगर येथे लाठीमार, अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या 
केशपूर येथेही पोलिसांचा लाठीमार 
कोंतई येथे उमेदवाराच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली 
गलईसुरा येथील मतदान केंद्राजवळ बॉंब सापडले 

कोलकता  - पश्‍चिम बंगालमध्ये आज पंचायत निवडणुकीदरम्यान उसळलेल्या राजकीय हिंसाचारात पाच जण ठार झाले. पंचायत निवडणुकीचे निकाल 17 मे रोजी लागणार आहेत. कडक बंदोबस्त असतानाही कार्यकर्त्यांत मारहाण, पोलिसांचा लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडणे, स्फोट घडवून आणणे, बॅलेट बॉक्‍स जाळणे, गोळीबार आदी घटना घडल्या आहेत. 

पश्‍चिम बंगालमध्ये आज सकाळी कडक बंदोबस्तात पंचायत निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले. सुमारे 70 हजारांहून अधिक सुरक्षा दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दुपारी दोन वाजेपर्यंत सुमारे चाळीस टक्‍क्‍यांहून अधिक मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तृणमूल कॉंग्रेस, भाजप आणि डाव्यांची प्रतिष्ठा पंचायत निवडणुकीत पणाला लागली आहे. पंचायत निवडणुकीत एकूण 58 हजार 692 जागांपैकी 20 हजार 76 जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आज सकाळपासून मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांब रांगा लागल्या होत्या. यादरम्यान बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात पाच जण ठार झाले. उत्तर चोवीस परगना, नादिया आणि दक्षिण चोवीस परगना जिल्ह्यात हिंसाचार झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. दक्षिण चोवीस परगना जिल्ह्यात एका घराला आग लावण्यात आली. त्यात दोघांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेला सीपीएमने तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना जबाबदार ठरवले आहे. 

घटनाक्रम 
मुर्शिदाबाद जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्याची गोळी झाडून हत्या 
दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यात तपन येथे एक ठार, चार जखमी 
अमदंगा येथील मतदान केंद्राबाहेर स्फोटात सीपीआय (एम) समर्थक ठार; अन्य जखमी 
नादियात हिंसाचार एक ठार, दोन जखमी 
कुचबिहार जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर मंत्र्याकडून एका व्यक्तीस मारहाण 
लोहमार्गावर तीन जिवंत बॉंब हस्तगत 
बसंती गट निवडणुकीत बुरखाधारी बंदूकधाऱ्यांचा वावर 
भानगर येथे लाठीमार, अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या 
केशपूर येथेही पोलिसांचा लाठीमार 
कोंतई येथे उमेदवाराच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली 
गलईसुरा येथील मतदान केंद्राजवळ बॉंब सापडले 

Web Title: Five dead scores injured in West Bengal panchayat poll violence