पाचशे, दोन हजार रुपयांच्या नोटा बंद करा : भाजप मंत्री

Five Hundred and Two Thousand rupees should close says BJP minister
Five Hundred and Two Thousand rupees should close says BJP minister

नवी दिल्ली : ''जर देशातून भ्रष्टाचार मिटवायचा असेल तर पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा बंद करा'', असा सल्ला उत्तरप्रदेशातील कॅबिनेटमंत्री ओमप्रकाश राजभर यांनी दिला. तसेच देशात आता पुन्हा एकदा नोटाबंदीचा निर्णय घ्या, असेही ते म्हणाले. 

भ्रष्टाचाराला आळा घालता यावा, यासाठी ही नोटाबंदी करावी, असे राजभर म्हणाले. पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या तरच देशातील भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि भ्रष्टाचार मिटवायचा असेल तर एक रुपया ते शंभर रुपये एवढ्याच नोटा चलनात ठेवण्यात याव्यात असाही सल्लाही राजभर यांनी दिला.  

दरम्यान, राजभर यांनी यापूर्वीही काही वक्तव्ये करून पक्षाला अडचणीत आणण्याचे काम केले होते. त्यानंतर आता त्यांनी नव्या पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात याव्यात, असा सल्ला दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com