लाल दिव्याला तिलांजली देणारे पहिले पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री!

साधेपणासाठी लोकप्रिय असलेल्या शास्त्री यांनी अनेक प्रसंगातून ते भारतातील सर्वात नम्र पंतप्रधानांपैकी एक आहेत हे सिद्ध केले.
Lal Bahadur Shastri
Lal Bahadur Shastri esakal

भारताचे पहिले पंतप्रधान (Prime Minister) जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर आता पंतप्रधान कोण?अशी चर्चा देशात सुरू झाली. त्यानंतर दोनच आठवड्यांनी गृहमंत्री लाल बहादूर शास्त्री (lal-bahadur-shastri) हे भारताचे दुसरे पंतप्रधान बनले. लाल बहादुर शास्त्री यांचा जन्म १९०४ साली उत्तर प्रदेशातील मुगलसराय येथे झाला. ११ जानेवारी १९६६ रोजी उजबेकिस्तान येथील ताश्कंदमध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यू ज्या परिस्थितीत झाला ते रहस्य आजही कायम आहे. आपल्या साधेपणासाठी लोकप्रिय असलेल्या शास्त्री यांनी अनेक प्रसंगी सिद्ध केले की ते भारतातील सर्वात नम्र पंतप्रधानांपैकी एक आहेत.याविषयी जाणून घेऊया.

Lal Bahadur Shastri
हमाल करी कमाल! UPSC मध्ये मारली बाजी

1. भारताचे गृहमंत्री असताना लाल बहादूर शास्त्री यांना एकदा कलकत्त्याहून दिल्लीला जाण्यासाठी विमान पकडावे लागले. फ्लाइट संध्याकाळची होती आणि रस्त्यावर ट्रॅफिक असल्याने शास्त्रींना वेळेवर विमानतळावर पोहोचणे अशक्य झाले होते. त्यामुळे रस्ते मोकळे व्हावेत, यासाठी पोलिस आयुक्तांनी शास्त्री यांच्या वाहनाऐवजी सायरनचे वाहन पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र, लाल बहादूर शास्त्रींनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. कारण त्यामुळे कलकत्त्याच्या लोकांना वाटेल की एखादी विशिष्ट व्यक्ती रस्त्यावर आली आहे. त्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला.

2. पंतप्रधान असताना एकदा शास्त्री यांना एका राज्याचा दौरा करायचा होता. काही तातडीच्या कामामुळे शेवटच्या क्षणी त्यांना दौरा रद्द करावा लागला. त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शास्त्री यांना पंतप्रधानांसाठी प्रथम श्रेणीची व्यवस्था केली असल्याने दौरा रद्द करू नका, अशी विनंती केली. तेव्हा शास्त्री म्हणाले, 'तुम्ही तृतीय श्रेणीतील व्यक्तीसाठी प्रथम श्रेणीची व्यवस्था का केली?'

Lal Bahadur Shastri
शंकराचार्यांच्या मूर्तीसाठी 2 हजार कोटींचा करणार खर्च MP सरकार

3. 1965 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू होते. तेव्हा देशातील अन्न संकट गंभीर पातळीवर पोहोचले होते. तरीही अमेरिका अन्नधान्याची निर्यात बंद करण्याची धमकी देत ​​होते. अशा वेळी शास्त्रीजींनी आपल्या कुटुंबीयांना काही दिवस एक वेळचे जेवण न घेण्यास सांगितले. शास्त्रीजी म्हणाले, उद्यापासून आठवडाभर संध्याकाळी चूल पेटणार नाही. ते म्हणाले की, लहान मुलांना दूध आणि फळे दिली जाऊ शकतात, पण मोठ्यांना एकवेळ उपाशी राहिले पाहिजे. एका वेळेच्या जेवणाशिवाय स्वतःचे कुटुंब जगू शकेल याची खात्री केल्यानंतर, त्यांनी आकाशवाणीच्या माध्यमातून देशातील लोकांना आठवड्यातून एकदा तरी न जेवण्याचे आवाहन केले. काही आठवडे, रेस्टॉरंट्स आणि इतर खाद्यपदार्थांच्या दुकानांनी हा नियम काटेकोरपणे पाळला.

4. शास्त्रीजी पंतप्रधान असताना त्यांच्या मुलाने वडिलांच्या ऑफिसची गाडी ड्राईव्हला जाण्यासाठी वापरली. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी शास्त्रीजींनी वाहनाच्या वैयक्तिक वापरासाठी जितकी रक्कम खर्च केली होती तितकी रक्कम सरकारच्या खात्यात जमा केली.

Lal Bahadur Shastri
देशात गांजावर पूर्णपणे बंदी नाही, केंद्राची हायकोर्टात माहिती

5. 1966 मध्ये लाल बहादूर शास्त्री यांचे निधन झाले तेव्हा त्यांच्या नावावर घर किंवा जमीन नव्हती असे म्हटले जाते. त्यांनी पंतप्रधान झाल्यानंतर फियाट कार घेण्यासाठी सरकारकडून कर्ज घेतले होते. शास्त्री यांच्या निधनानंतर बँकेने त्यांच्या पत्नीला ललिता शास्त्री यांना घेतलेले कर्ज फेडण्यास सांगितले, जे त्यांनी कौटुंबिक पेन्शनमधून फेडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com